उष्णतेने महाराष्ट्र होरपळला; राज्यात मार्चपासून उष्माघाताचे २२६ रुग्ण 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

उष्णतेने महाराष्ट्र होरपळला; राज्यात मार्चपासून उष्माघाताचे २२६ रुग्ण

महाराष्ट्रात सध्या उन्हाची तीव्र लाट पसरली असून उष्माघाताच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

अमित श्रीवास्तव

अमित श्रीवास्तव/मुंबई

महाराष्ट्रात सध्या उन्हाची तीव्र लाट पसरली असून उष्माघाताच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मार्च ते २० मे या अडीच महिन्यांच्या कालावधीत राज्यातील उष्माघाताच्या रुग्णांची एकूण संख्या २२६ वर पोहोचली आहे. विशेषतः मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात केवळ चार दिवसांत तब्बल १७१ जणांना उष्माघाताचा फटका बसल्याने राज्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. उन्हाच्या या तीव्र लाटेमुळे राज्यात ६ संशयित मृत्यूंची नोंद झाली असून अंतिम अहवालानंतर यावर शिक्कामोर्तब होईल.

लाटेचा सर्वाधिक फटका संभाजीनगरला बसला असून तेथे सर्वाधिक ४१ रुग्णांची नोंद झाली. नंदुरबारमध्ये २४, नाशिकमध्ये १९, बुलढाण्यात १७, अमरावतीत १६ तर वर्ध्यात १४ रुग्ण आढळले. मुंबईत तापमान वाढत असले तरी उष्माघाताचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

महापालिकांना २७९२ कोटींचे GST भरपाई; मुंबई महापालिकेला सर्वाधिक १२९४ कोटी

Mumbai : धक्कादायक! SNDT कॉलेजच्या कराटे प्रशिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा आरोप; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; पुण्यातील घटनेचा VIDEO व्हायरल

Thane : 'स्वस्त घर' आणि शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने २.९७ कोटींची फसवणूक; तिघांविरोधात तक्रार

मुंबईला मलेरिया डेंग्यूचा घट्ट विळखा; तीन महिन्यांत मलेरियाचे साडेचार हजार रुग्ण