महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण! भाजप जिल्हा पदाधिकाऱ्याच्या मुलाचा प्रताप

पेणमध्ये एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याच्या मुलाने तब्बल सहा महिन्यांत अनेकवेळा तिचे शारारिक शोषण करून तिला ठार मारून टाकण्याची धमकी देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Swapnil S

पेण : पेणमध्ये एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याच्या मुलाने तब्बल सहा महिन्यांत अनेकवेळा तिचे शारारिक शोषण करून तिला ठार मारून टाकण्याची धमकी देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

भाजप महिला सरचिटणीस आणि जिल्हा शांतता कमिटी सदस्य असणाऱ्या वंदना म्हात्रे यांचा मुलगा मनिष म्हात्रे याने एका १५ वर्षीय मुलीला लग्नाचे अमिश दाखवून सप्टेंबर महिन्यापासून अनेक वेळा शारीरिक उपभोग घेऊन अत्याचार केल्याचा गुन्हा पेण पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

याविषयी सविस्तर वृत्त असे की, यातील पिडीत मुलगी आणि मनिष यांची स्नॅप चॅटवरून मे २०२४ मध्ये ओळख झाली. त्यावर ते एकमेकांशी बोलू लागले. ऑगस्ट २०२४ मध्ये मनिष याने पिडीत मुलीला तु मला आवडतेस मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, असे बोलून तिला प्रेमाच्या जाळयात ओढले. सायन्स विषयाच्या नोटस्‌ घेण्यासंदर्भात ते साई मंदिर पेण येथे भेटले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात मनिष याने आपल्या चिंचपाडा येथील शिवानी गृहनिर्माण संस्था येथे घरी बोलावले आणि तिच्या इच्छेविरुध्द तिच्यावर अत्याचार केला.

मात्र २३ फेब्रुवारी २०२५ रोजी पीडित मुलीच्या वडिलांसमोर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान पोलिसांनी यातील आरोपी मनिष याला ताब्यात घेतले आहे.

आता चित्रा वाघ आवाज उठवणार का?

भाजपच्या नेत्या तथा आमदार चित्रा वाघ हया महिलांच्या अत्याचाराविरुध्द सतत आवाज उठवत असतात. महिलांचा आवाज म्हणून त्या आख्या महाराष्ट्रात सुपरिचित आहेत. मात्र आत्ता त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकारी महिलेच्या मुलाने १५ वर्षाच्या मुलीवर गेली सहा महिने अत्याचार केला आहे. त्याविरुध्द त्या आवाज उठवून पिडितेल न्याय देणार का? असा सवाल जनसामान्य जनतेला पडला आहे.

पंतप्रधान मोदींना ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ ओमान’ प्रदान; मोदी म्हणाले, "हा सन्मान भारताच्या...

मोठी बातमी! अजित पवारांनी स्वीकारला माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती

मनरेगाचे नाव इतिहासजमा; VB-G RAM G विधेयक मंजूर, प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल, "हे सर्व गरिबांच्या...

BMC Election : महायुतीतून अजित दादांची NCP आउट, भाजप-शिवसेनेचं १५० जागांवर ठरलं; अमित साटम यांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश; म्हणाल्या - 'राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवाभाऊंच्या...