संभाजीनगर महापालिकेत महायुती तुटली; शिंदे गट आणि भाजपमध्ये आरोप- प्रत्यारोपांचे वातावरण 
महाराष्ट्र

संभाजीनगर महापालिकेत महायुती तुटली; शिंदे गट आणि भाजपमध्ये आरोप- प्रत्यारोपांचे वातावरण

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण अत्यंत तापलेले होते. छत्रपती संभाजीनगर महायुतीतील पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजप ८७, शिंदे सेना ८७,अजित राष्ट्रवादी १८,एमआयएम ८,वंचित बहुजन ७०, उबाठा ९९ काँग्रेस ८० ठिकाणी फॉर्म भरल्याचे समोर आले आहे. मुदत संपेपर्यंत एकूण १७२ अर्ज दाखल झालेत.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण अत्यंत तापलेले होते. छत्रपती संभाजीनगर महायुतीतील पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजप ८७, शिंदे सेना ८७,अजित राष्ट्रवादी १८,एमआयएम ८,वंचित बहुजन ७०, उबाठा ९९ काँग्रेस ८० ठिकाणी फॉर्म भरल्याचे समोर आले आहे. मुदत संपेपर्यंत एकूण १७२ अर्ज दाखल झालेत.

शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी फॉर्म भरण्याची वेळ संपताच बाहेर येऊन भाजप विरोधात हर्षदाताई शिरसाट यांच्या उपस्थितीत घोषणाबाजी केली आणि परिसर दणाणून टाकला.

भाजप नेते, राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी पलटवार करत सांगितले की, शिंदे गटाने घरातील राजकीय पुनर्वसन प्राधान्य दिल्यामुळे स्वतः युती तुटवली आहे.

भाजपमध्ये अंतर्गत खदखद

प्रभाग २० मधील इच्छूक उमेदवार दिव्या उल्हास मराठे यांनी तिकीट नाकारल्याने भाजप कार्यालयात नेत्यांना अक्षरशः धारेवर धरले. त्यांनी सांगितले. १८ वर्षे पक्षासाठी काम केले, १८ केसेस अंगावर घेतल्या, पण आज पक्षाच्या उच्चपातळीवर येऊन जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. शिंदे गट आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण करत असून, निवडणूक रणधुमाळी आता अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

CJP Protest : 'त्या' आंदोलकांची सुटका करा; सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्रासह ७ राज्यांना आदेश

'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

जपानमध्ये ७.१ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा, हादरवणारे Video व्हायरल

पत्नीचा जीव जात असताना मोबाईलमध्ये VIDEO शूट; पतीच्या कृत्याने पोलिसही हादरले

आरक्षणाच्या व्हायरल पोस्टवर शिल्पा शेट्टीचा संताप; म्हणाली - "माझ्या नावाने खोटी माहिती पसरवली...