महाराष्ट्र

शरद पवार गटाचा 'चलो मुंबई 'चा नारा; ५ जुलैच्या मोर्चासाठी जय्यत तयारी

मराठी भाषा सक्तीविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी येत्या पाच जुलैला मोर्चाची हाक दिली आहे. याला उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. असे असताना ठाण्यात शरद पवार गटाने देखील या मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.

Swapnil S

ठाणे : मराठी भाषा सक्तीविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी येत्या पाच जुलैला मोर्चाची हाक दिली आहे. याला उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. असे असताना ठाण्यात शरद पवार गटाने देखील या मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.

ठाण्यात या मोर्चाला पाठिंबा दिल्याचे फलक सर्वत्र झळकावले आहेत. या फलकावर मराठी अस्मिता जागृत करूया ठाकरेच्या नेतृत्वात मोर्चा सामील होऊया! ठाकरेंचा मोर्चा राष्ट्रवादीचा पाठिंबा ! असा उल्लेख करण्यात आला आहे. शरद पवार गटाचे पदाधिकारी प्रकाश पाटील यांच्यावतीने कळवातील विविध भागात लावण्यात आलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. महाराष्ट्रात शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला राज ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे. या अनुषंगाने त्यांनी येत्या ५ जुलै रोजी मुंबईला गिरगाव चौपाटी येथून एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला उद्धव सेनेने सुद्धा आपला पाठिंबा दर्शवला आहे. दोन्ही ठाकरे बंधू मुंबईमध्ये मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाला शरद पवार गटाने देखील पाठिंबा दिला आहे. तसेच त्यांचा पक्ष देखील या मोर्चात सामील होणार आहे. यानंतर ठाण्यामध्ये शनिवारी सकाळीच त्यानिमित्ताने बॅनरबाजी पहायला मिळाली.

बॅनर लावून सहभागी होण्याचे आवाहन

शरद पवार गटाचे ठाणे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या वतीने ठाण्यातील, कळवा नाका, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, स्टेशन रोड आदी परिसरात बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर राज ठाकरे उद्धव ठाकरेसह शरद पवारांचे छायाचित्र आहे. या बॅनरवर चला मुंबई, मराठी अस्मिता जागृत करूया ठाकरेच्या नेतृत्वात मोर्चा सामील होऊया! मराठी भाषेच्या अभिमानासाठी ठाकरेंचा मोर्चा राष्ट्रवादीचा पाठिंबा! शरद पवार साहेबांच्या विचाराचा मान ! जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी मैदानात ! एक श्वास मराठीचा ध्यास ! मराठीसाठी आम्ही एकत्र आलोय आता आवाज उठवायचा, असा देखील मजकूर लिहिला आहे.

एअर ॲम्ब्युलन्स, नव्या सेवांसाठी कार्यपद्धती; सात सदस्यीय समिती गठित, दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

'मला लंडनला जाण्यापासून रोखलं'; ऑक्सफर्डच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या CJP चे सौरव दास यांचा आरोप, Video

Mumbai : एफडीतील ३० हजार कोटी रुपये गेले कुठे? मोठ्या प्रकल्पासाठी ठेवी मोडल्या - अश्रफ आझमी

नवरा वारंवार माहेरी पाठवायचा, संशय आल्याने बायकोने घरात लावले CCTV; फुटेज पाहून पायाखालची जमीनच सरकली

ठाणे जिल्ह्यात दुष्काळाचे सावट; नाचणी, वरईने मान टाकली; पिकांना ९० ते ९५ टक्के फटका