महाराष्ट्र

शरद पवार यांनी घेतली एकनाथ खडसे यांची भेट ; तब्येतीची केली विचारपूस

रविवारी एकनाथ खडसे यांना एअर अ‍ॅम्ब्यूलन्सद्वारे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं

नवशक्ती Web Desk

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांना छातीत त्रास होत असल्याने जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रविवारी त्यांना एअर अ‍ॅम्ब्यूलन्सद्वारे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यानंतर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन एकथाथ खडसे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यावेळी, एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकीनी खडसे यांची उपस्थिती होती.

मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये एकनाथ खडसले यांच्या पुढील तपासण्या सुरु आहेत. मुक्ताईनगरला खडसेंच्या छातीत दुखायला लागलं. यानंतर त्यांना गजानन हार्ट हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं होतं. याठिकाणी त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, राष्ट्र्वादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी मुंबईतील रुग्णालयात एकनाथ खडसे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. यावेळी मंदाकीनी खडसे या देखील उपस्थित होत्या. शरद पवार यांनी खडसेंसोबत संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी या भेटीचा व्हिडिओ ट्विटर या सोशल मीडिया माध्यमावर शेअर केला आहे.

Pune Ganesh Visarjan 2025 : पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत भक्तांचा उत्साह; पारंपरिक जल्लोषात विसर्जन

पालखी निघाली राजाची...लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; भाविकांना अश्रू अनावर | Video

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक