महाराष्ट्र

मोठी बातमी ; अखेर शरद पवारांना नमते घ्यावेच लागले, राजीनामा देण्याचा निर्णय मागे

कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आग्रहानंतर शरद पवार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे

नवशक्ती Web Desk

राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आग्रहानंतर शरद पवार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

शरद पवार म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर तीव्र भावना होत्या. तसेच, माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असलेले कार्यकर्ते, असंख्य चाहते एकत्र आले आणि त्यांनी मला निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले.

“देशभरातील, विशेषतः महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि सहकाऱ्यांनी मला अध्यक्षपदाचा कार्यभार पुन्हा सुरू करण्याची विनंती केली. लोक मला सांगतात, हे माझ्या प्रदीर्घ सार्वजनिक आयुष्याचे रहस्य आहे, मी तुमच्या भावनांचा अनादर करू शकत नाही. तुम्ही दाखवलेले प्रेम आणि विश्वास पाहून मी भारावून गेलो आहे,’ अशी भावना शरद पवार यांनी व्यक्त केली.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी