महाराष्ट्र

"मी 22 जानेवारीनंतर रामलल्लाचे दर्शन घेणार, तोपर्यंत..." अयोध्येतून आमंत्रण मिळाल्यावर शरद पवारांचे पत्र

अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार असून या सोहळ्याचं निमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (शरद पवार गट) शरद पवार यांनाही मिळालं आहे. मात्र,...

Swapnil S

अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार असून या सोहळ्याचं निमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (शरद पवार गट) शरद पवार यांनाही मिळालं आहे. मात्र, "२२ जानेवारीच्या सोहळ्याला उपस्थित राहणार नाही. २२ जानेवारीनंतर रामलल्लाच्या दर्शनाला अयोध्येत येऊ", असे शरद पवार यांनी राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांना पत्राद्वारे कळवले आहे.

तसेच, निमंत्रणाबाबत आभार मानत राम मंदिराचे बांधकाम अपूर्ण असल्याचीही जाणीव पवारांनी करुन दिली आहे. २२ जानेवारीनंतर दर्शनाला येईल, तेव्हा आरामात दर्शन घेता येईल आणि तोपर्यंत राम मंदिराचं बांधकामही पूर्ण झालं असेल, असे त्यांनी पत्रात लिहिले आहे.

पत्रात काय म्हटलंय पवारांनी-

"२२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले, त्याबद्दल आभारी आहे. भगवान राम भारतातीलच नाही तर जगभरातील भक्तांचे श्रद्धास्थान आहे. अयोध्यातील सोहळ्याची राम भक्तांमध्ये उत्सुकता आहे, त्यामुळे ते मोठ्या संख्येने अयोध्येत येत आहेत. त्यांच्या माध्यमातून या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद माझ्यापर्यंत पोहोचेन. पण, २२ जानेवारीच्या सोहळ्यानंतर रामलल्लाचे दर्शन सहज आणि आरामात घेता येईल. माझा अयोध्येत येण्याचा कार्यक्रम निश्चित आहे. मी येईन तेव्हा श्रद्धापूर्वक रामाचं दर्शन घेईन. तोपर्यंत राम मंदिराचं बांधकामही पूर्ण झालेलं असेल. तुमच्या स्नेहपूर्ण निमंत्रणासाठी मी पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानतो. सोहळा यशस्वीपणे पार पडावा यासाठी माझ्या शुभेच्छांचा स्वीकार करावा", असे पवारांनी पत्रात म्हटले आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले