रोहित पवार  संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

शिर्डीत अटक केलेल्या ‘त्या’ चाैघांचा रुग्णालयात मृत्यू ; आमदार रोहित पवार यांचा आरोप

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या मंदिर नगरीत भीक मागण्याच्या आरोपावरून अटक केलेल्या ५१ जणांपैकी चार जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी केला.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या मंदिर नगरीत भीक मागण्याच्या आरोपावरून अटक केलेल्या ५१ जणांपैकी चार जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी केला.

या मृत्यूंची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले, “शिर्डीत ५१ जणांना भीक मागत असल्याच्या आरोपावरून अटक करून तुरुंगात डांबण्यात आले. त्यांची तब्येत बिघडल्याने काहींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला.” “या रुग्णांना अमानवी वागणुक दिल्याचे प्रकार समोर येत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग

Bhayandar : सूर्या प्रकल्पाच्या पाइपलाइन टेस्टिंगदरम्यान स्फोट; सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

Navi Mumbai : सिडकोच्या वसाहती तहानलेल्याच; खारघर, कळंबोली, तळोजात पाणीटंचाईचे संकट