विधान परिषद निवडणूक : कोकणातून बाळ माने यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी 
महाराष्ट्र

विधान परिषद निवडणूक : कोकणातून बाळ माने यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी

विधान परिषदेच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माजी आमदार सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांना उमेदवारी दिली आहे. माने हे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Swapnil S

मुंबई : विधान परिषदेच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माजी आमदार सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांना उमेदवारी दिली आहे. माने हे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

विधान परिषदेच्या १७ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी येत्या १८ जूनला मतदान होत आहे. महाविकास आघाडी ही निवडणूक एकत्र लढवत आहे. आघाडीत १७पैकी १५ जागांवर एकमत झाले असून शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, जळगाव, परभणी-हिंगोली व छत्रपती संभाजीनगर-जालना अशा चार जागा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी ठाकरे गटाने बाळ माने यांची उमेदवारी निश्चित केली.

माने हे मूळ भाजपचे आहेत. १९९९ मध्ये ते रत्नागिरी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाने त्यांना रत्नागिरीमधून विधानसभेची उमेदवारी दिली होती, मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

Mumbai : रविवार ठरला घातवार! विविध अपघातांमध्ये ५ जण ठार, ९ जखमी

अडवाणी, सिसोदियांना नोटीस; मतदारयादी तपासणीमध्ये पूर्वीच्या यादीशी मेळ न जुळल्याने कारवाई

Maharashtra TET Paper Leak : दोन फरार आरोपींना अटक

Mumbai : आयआयटी प्राध्यापक मंचाचा दुल्ला यांना पाठिंबा

Mira-Bhayandar : मेट्रो ब्रिजचा ब्लॉक कोसळून तरुण जखमी