महाराष्ट्र

डिसेंबरपासून मुंबई-पुणे मार्गावर शिवाई बस धावणार

शिवाई बससाठी चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण केले आहे. ठाण्यातही बससाठी चार्जिंग सुविधा उपलब्ध केली आहे

प्रतिनिधी

एसटी महामंडळाने विजेवर धावणारी पहिली शिवाई वातानुकूलित बस पुणे ते नगर मार्गावर चालवल्यानंतर येत्या डिसेंबर पासून मुंबई-पुणे मार्गावर शिवाई बस प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या मार्गावर १०० शिवाई बस चालवण्यात येणार आहेत.

प्रदूषणुक्त प्रवास, इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने विजेवरील वातानुकूलित शिवाई बस चालवण्याचा निर्णय घेतला. अशा १५० बस महामंडळाच्या ताफ्यात टप्प्याटप्यात येणार असून पहिल्या टप्यात ५० बस आणि दुसऱ्या टप्प्यात १०० बस दाखल होतील. ५० बसपैकी दोन बस पुणे -नगर -पुणे मार्गावर नुकत्याच चालवण्यात आल्या. मुंबई, ठाणे -पुणे मार्गावरही डिसेंबरपासून शिवाई बस चालवण्याचे नियोजन आहे. कंपनीकडून या बस एसटी महामंडळाला मिळण्यास बराच विलंब झाला आहे. या मार्गावर टप्प्याटप्प्यात ऑक्टोबर २०२२ पासून ३० शिवाई बस येणार होत्या. त्यानंतर जानेवारी २०२३ पासून आणखी शिवाई बस प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे नियोजन होते. दरम्यान, अलीकडेच मुंबईतील परेल आगार सोडता अन्य आगारात विजेवरील शिवाई बससाठी चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण केले आहे. ठाण्यातही बससाठी चार्जिंग सुविधा उपलब्ध केली आहे. परेल आगारात लवकरच हे काम होईल अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.

१०० बसेसपैकी ९६ बस विविध मार्गावर चालवण्याचे नियोजन

दादर ते पुणे रेल्वे स्थानक व्हाया चिचंवड- २४ बस

परेल-स्वारगेट-२४ बस

ठाणे-स्वारगेट-२४ बस

बोरीवली-स्वारगेट-२४ बस

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

पहिल्या आठवड्याचे फलित काय?

मराठी पाऊल पडते पुढे