संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

आई-वडिलांना दहा जूनपर्यंत पोलीस कोठडी, पुणे ‘हिट अँड रन’ प्रकरण

Swapnil S

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन १७ वषीय आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी अटकेत असलेल्या ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांना सात जूनपर्यंत, तर मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आई शिवानी अग्रवाल या आरोपींना दहा जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, रुग्णालयात डॉक्टरांनी घेतलेले रक्त हे मुलाच्या आईचे असल्याचे फॉरेन्सिक अहवालवरून स्पष्ट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणातील संबंधित आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने डॉ. तावडे, डॉ. हळनोर आणि घटकांबळे यांना सात जूनपर्यंत, तर विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल या आरोपींना दहा जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यावेळी ससून रुग्णालयात डॉक्टरांनी घेतलेले रक्त हे मुलाच्या आईचे असल्याचे फॉरेन्सिक अहवालवरून स्पष्ट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे म्हणाले, या केसमध्ये एकूण सात आरोपी अटक करण्यात आली आहे. गुन्हा घडल्यावर ससून रुग्णालयात मुलाच्या रक्ताचा नमुना घेण्यात आला. मात्र, त्याबाबतचा डीएनए अहवाल प्राप्त झाला असून डॉक्टरांनी घेतलेले रक्त हे मुलाचे आईचे आहे, हे सिद्ध झाले आहे. आरोपी मुलाचे आईवडील यांनी कट रचून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपी यांनी कशाप्रकारे गुन्हाचा कट रचला. याबाबत एकत्रित तपास करणे गरजेचे आहे. सायबरतज्ज्ञांच्या मदतीने आरोपीचे मोबाईल विश्लेषण सुरू असून नवीन पुरावे समोर येत आहेत. आरोपींची साखळी स्पष्ट होण्यासाठी त्यांची सात दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक आहे.

सरकारी वकील सुनील कुंभार म्हणाले, आरोपींना अटक केल्यापासून पोलीस चांगल्या प्रकारे तपास करून प्रगती करत आहेत. आरोपींची साखळी स्पष्ट करण्यात आली असून त्यांचा एकत्रित तपास होणे महत्त्वाचे आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस