उद्धव ठाकरे
महाराष्ट्र

विधान परिषद निवडणुकीआधी शिवसेना ठाकरे गटाचा सावध पवित्रा, सर्व आमदारांचा हॉटेलमध्ये मुक्काम

Suraj Sakunde

मुंबई: विधान परिषद निवडणुकीआधी शिवसेना ठाकरे गटानं सावध पवित्रा घेतल्याचं दिसतंय. निवडणुकीदरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे आमदार हॉटेलमध्ये मुक्कामी असणार आहेत. १० ते १२ जुलै दरम्यान ठाकरेंचे १६ आमदार हॉटेलमध्ये मुक्कामी असतील. विधान परिषद निवडणूकीमध्ये कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये, यासाठी ठाकरे गटाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या १२ जुलै रोजी विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून एकूण ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. यामुळं एका उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागणार हे निश्चित आहे. त्यामुळं सर्व राजकिय पक्षांकडून सावधगिरी बाळगली जात आहेत. या निवडणूकीमध्ये ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर निवडणुकीला सामारे जात आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून सावधगिरी बाळगली जात आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १० ते १२ जुलैदरम्यान ठाकरे गटाच्या आमदारांचा हॉटेलमध्ये मुक्काम असणार आहे.

११ जागा १२ उमेदवार...

येत्या १२ जुलै रोजी विधान परिषदेच्या ११ रिक्त जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये भाजपचे ५, शिवसेना शिंदे गटाचे २, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे २, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाचा प्रत्येकी १ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहे.

भाजपचे उमेदवार-

पंकजा मुंडे

परिणय फुके

अमित बोरखे

योगेश टिळेकर

सदाभाऊ खोत

शिवसेना (शिंदे गट)-

भावना गवळी

कृपाल तुमणे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)-

राजेश विटेकर

शिवाजीराव गर्जे

काँग्रेस-

डॉ. प्रज्ञा राजीव सातव

शेतकरी कामगार पक्ष-

जयंत पाटील

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-

मिलिंद नार्वेकर

कशी होणार निवड:

विधानसभेतील आमदारांमधून विधानपरिषदेच्या सदस्यांची निवड होणार आहे. विधानसभेतील एकूण आमदारांची संख्या भागिले विधानपरिषदेतील रिक्त जागांची संख्या अधिक १ या पद्धतीनं कोटा ठरतो. राज्यात विधानसभेच्या एकूण जागा २८८ आहेत. पण, परंतु काही आमदारांनी विविध कारणांमुळं राजीनामे दिल्यामुळं हे संख्याबळ २७४ वर आलं आहे. त्यामुळं विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी उमेदवाराला २३ (२४४ भागिले ११ अधिक १=२२.८३) मतं आवश्यक आहेत. मतमोजणीत २३ मतांचा कोटा पूर्ण केलेले उमेदवार पहिल्याच फेरीत विजयी होतील. तसं न झाल्यास दुसऱ्या पसंतीची आणि आवश्यकता भासल्यास तिसऱ्या पसंतीची मतं मोजली जातील आणि त्यातून निकाल ठरणार आहे.

Mumbai Local Mega Block Update : प्रवाशांनो लक्ष द्या...रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर ब्लॉक, जाणून घ्या डिटेल्स

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज Metro-3 चे उद्घाटन; अंतर्गत रिंग मेट्रो, ठाणे पालिकेच्या नवीन इमारतीचेही भूमिपूजन

पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार; पोलिसांकडून संशयित आरोपींचे स्केच जारी

निराधार दुर्गांची जीवनभरारी! बालगृहातील भगिनी ते अधीक्षिका; सांगलीच्या सपनाचा स्फूर्तिदायी प्रवास

इस्त्रायलचा खात्मा करणार; इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांची गर्जना