महाराष्ट्र

पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपीवर झाडल्या गोळ्या; एक ठार, एक जखमी, नांदेडच्या शहीदपुरा भागातील घटना

नांदेडच्या शहीदपुरा भागात गोळीबार झाल्याची घटना सोमवारी (दि.१०) सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास घडली. यात एक जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एक जखमीवर विष्णुपुरी येथील श्री गुरुगोविंदसिंग शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Swapnil S

नांदेड : नांदेडच्या शहीदपुरा भागात गोळीबार झाल्याची घटना सोमवारी (दि.१०) सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास घडली. यात एक जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एक जखमीवर विष्णुपुरी येथील श्री गुरुगोविंदसिंग शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात जखमींमधील एक जण पॅरोलवर आलेला कैदी आहे. तसेच हल्लेखोराने एकूण १० गोळ्या झाडल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी तीन रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत. दरम्यान, हल्लेखोर घटनास्थळावरून दुचाकीवर फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. रविंद्रसिंघ दयासिंघ राठोड असे मृताचे नाव असून, गुरमितसिंघ जगिंदरसिंघ सेवादार हा जखमी आहे.

गुरमितसिंघ जगिंदरसिंघ सेवादार आणि त्याचा मित्र रविंद्रसिंघ दयासिंघ राठोड हे दोघे कारने सोमवारी (दि.१०) सकाळी ९ ते ९.१५ वाजेदरम्यान जात असतांना नांदेडच्या शहीदपुरा भागात त्यांच्यावर हा गोळीबार झाला. यावेळी एकच गोंधळ उडाला. हल्लेखोर एका दुचाकीवर पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, वजिराबादचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्यासह अंमलदार हजर होते. या ठिकाणी फॉरेन्सिक पथक दाखल झाले होते. जखमींना विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान, रविंद्रसिंघ दयासिंघ राठोड याचा मृत्यू झाला. गुरमितसिंघला ८ गोळ्या लागल्या आहेत आणि रविंद्रसिंघ राठोडला २ गोळ्या लागल्याची माहिती आहे.

दरम्यान, कुख्यात दहशतवादी हरविंदरसिंघ उर्फ रिंदाचा भाऊ सत्येंद्रसिंघ उर्फ सत्या याचा २०१५-२०१६ मध्ये खून झाला होता.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या