महाराष्ट्र

चार भिंतीत बसल्यावर लोकांच्या भावना कशा कळणार? उद्धव ठाकरेंवर टीका करताना काय म्हणाले श्रीकांत शिंदे?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेमध्ये उपस्थितीत राहत, सत्ताधारी पक्षावर टीका केली.

प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेमध्ये उपस्थितीत राहत, सत्ताधारी पक्षावर टीका केली. यानंतर शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून टीका करण्यात आली. ते म्हणाले की, "चार भिंतींच्या आत बसलो किंवा घरात बसलो, तर लोकांच्या भावना कशा कळणार? आज अधिवेशनात बोलणारे अडीच-तीन वर्षात पहिल्यांदाच नागपूरला आले असतील. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका." अशी टीका केली.

ते पुढे म्हणाले की, "लोकांच्या, कार्यकर्त्याच्या भावना जाणून घेण्यासाठी तसे काम करावे लागते. लोकांना भेटावे लागते, त्यांच्यात मिसळावे लागते. कार्यकर्त्यांनाही जपावं लागत. ५० आमदारांसह १३ खासदार का गेले? याचे आत्मपरीक्षण त्यांनी करायला हवे. लोक पक्ष सोडून का चालले आहेत? हे त्यांनी तपासायला हवे. हे डबल इंजिन सरकार आहे, चांगले काम करत आहे. तुम्ही अडीच वर्ष घरी बसून काम केले, राज्याला मागे घेऊन गेले, अशी टीका त्यांनी केली.

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

पृथ्वीराज चव्हाण, विखे-पाटील यांना कोर्टाचा दिलासा

चेंगराचेंगरी हा द्रमुकाचा कट; विजय थलापतींचा आरोप; उच्च न्यायालयात धाव

GST दर कपातीनंतर NCH ला तीन हजार तक्रारी प्राप्त; ग्राहक व्यवहार सचिवांची माहिती