स्वयंपाकघरात घुसलेल्या बिबट्याचे यशस्वी रेस्क्यू; वनविभागाच्या कारवाईमुळे अनर्थ टळला  
महाराष्ट्र

Vengurla : स्वयंपाकघरात घुसलेल्या बिबट्याचे यशस्वी रेस्क्यू; वनविभागाच्या कारवाईमुळे अनर्थ टळला

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली गावात एका जखमी बिबट्याने थेट घरात शिरून स्वयंपाकघर गाठल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Swapnil S

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली गावात एका जखमी बिबट्याने थेट घरात शिरून स्वयंपाकघर गाठल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दाभोली येथील रहिवासी विवेक जोशी यांच्या घरात हा बिबट्या अचानक शिरला. बिबट्या स्वयंपाकघरात असल्याचे लक्षात येताच विवेक जोशी यांनी प्रसंगावधान राखत घरातील सर्व सदस्यांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी घराचे दरवाजे बाहेरून बंद करून तातडीने वनविभागाशी संपर्क साधला.

माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. बिबट्या जखमी अवस्थेत असल्याने तो आक्रमक होण्याची शक्यता होती. मात्र, वनविभागाच्या पथकाने अत्यंत दक्षतेने जाळीचा वापर करून बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद केले.

जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याला पुढील उपचारांसाठी वनविभागाच्या ताब्यात घेण्यात आले आहे. भरवस्तीत आणि थेट घरात बिबट्या शिरल्याने ग्रामस्थांमध्ये काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

Mumbai : महापौरांचा पती असल्याचे सांगत शिक्षकाच्या फोटोचा गैरवापर; बदनामीकारक यूट्यूब व्हिडीओप्रकरणी FIR दाखल

Mumbai : चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार! चारित्र्यावर संशय घेत गर्भवती प्रेयसीचा काढला काटा; प्रियकराला अटक

Video : चुकून लेडीज डब्यात चढला; धावत्या लोकलमधून उडी मारणार इतक्यात...

Navi Mumbai : रबाळे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट, Video

शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मिळाली गती; शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन