Sindhudurg : ...अखेर पिंगुळीतील मगर जेरबंद; नैसर्गिक अधिवासात सुरक्षित मुक्तता 
महाराष्ट्र

Sindhudurg : ...अखेर पिंगुळीतील मगर जेरबंद; नैसर्गिक अधिवासात सुरक्षित मुक्तता

कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील तलावात शिरलेल्या मगरीला वनविभागाच्या जलद बचाव पथकाने (RRT) आणि कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप जेरबंद केले.

Swapnil S

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील तलावात शिरलेल्या मगरीला वनविभागाच्या जलद बचाव पथकाने (RRT) आणि कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप जेरबंद केले. पशुवैद्यकीय तपासणीनंतर मगरीला कोणतीही इजा झाली नसल्याचे स्पष्ट झाल्याने तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.

तलावात मगर असल्याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तलाव खोल असून मोठ्या प्रमाणात पाणी व गाळ असल्याने मगरीला पकडणे आव्हानात्मक ठरले. मड पंपच्या साहाय्याने तलावातील पाणी कमी करण्यात आले. जवळपास पाच ते सहा तासांच्या प्रयत्नांनंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना आणि RRT पथकाला मगरीला पकडण्यात यश आले. उपवनसंरक्षक मिलिंद शर्मा आणि सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा धसका; मुंबईत आझाद मैदानाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आंदोलनाला मनाई, फक्त १ दिवसाची परवानगी

नौदलाची पाणबुडी बचाव क्षमता आणखी वाढणार; भारतीय नौदलात ‘निपुण’ युद्धनौका ३१ ऑगस्टला होणार दाखल

टिटवाळा स्थानकात १५ रात्रींचा पॉवर ब्लॉक; प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी लोकल प्रवाशांचे हाल

उत्तर प्रदेश, बिहार निवडणुकांवर डोळा ठेवून आंदोलन - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

राम मंदिर देणगी घोटाळ्याच्या CBI चौकशीची मागणी; सरकारने बैठक रोखली, संत-महंत संतप्त