महाराष्ट्र

सख्ख्या बहिणीनेच केला वनराज आंदेकर यांचा खून, माजी नगरसेवकाच्या हत्येने खळबळ

Swapnil S

पुणे : पुण्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची सख्खी बहिण आणि दाजींनीच त्यांचा गेम केल्याचे निष्पन्न झाले आहे. कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादातून ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी वनराज यांचे दाजी गणेश कोमकर आणि जयंत कोमकर यांच्यासह दोन सख्ख्या बहिणी संजीवनी कोमकर अन् कल्याणी कोमकर यांना पोलिसांनी अटक केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर दहा ते बारा तरुणांनी पिस्तूल आणि कोयत्याने केलेल्या हल्ल्यात त्यांचा रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मृत्यू झाला. या हल्ल्यामागे दुसरे तिसरे कोणी नसून वनराज आंदेकर यांच्या सख्ख्या बहिणी आणि दाजी असल्याचे समोर आले आहे. एका भांडणामध्ये मध्यस्थी करून भांडणे मिटवल्याच्या तसेच दुकानाचे अतिक्रमण पाडायला लावल्याच्या रागातून बहिणीने वनराज यांना 'तुला पोरं बोलवून ठोकतेच' अशी धमकी दिली होती आणि त्यानंतर वनराज यांच्यावर हल्ला झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुण्याच्या गुन्हेगारी विश्वासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सख्ख्या बहिणींनीच भावाचा खून केल्यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.

याप्रकरणी संजीवनी कोमकर, जयंत कोमकर, प्रकाश कोमकर, गणेश कोमकर, सोमनाथ गायकवाड (रा. आंबेगाव पठार, धनकवडी) अनिकेत दूधभाते (रा. आंबेगाव पठार, धनकवडी), तुषार उर्फ आबा कदम (रा. धनकवडी), सागर पवार (रा. धनकवडी), पवन करताल (रा. मंगळवार पेठ) सॅम ऊर्फ समीर काळे यांच्यासह आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सूर्यकांत ऊर्फ बंडू राणूजी आंदेकर (वय ६८, रा. सोनाई दादा निवास, नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत