प्रातिनिधिक फोटो
महाराष्ट्र

रत्नागिरी नर्स बलात्कारप्रकरणी एसआयटी स्थापन, संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

रत्नागिरी सरकारी रुग्णालयात प्रशिक्षणार्थी नर्सवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची एसआयटीमार्फत (विशेष कृती दल) चौकशी करण्यास रत्नागिरी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी सुरुवात केली आहे.

Swapnil S

रत्नागिरी : रत्नागिरी सरकारी रुग्णालयात प्रशिक्षणार्थी नर्सवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची एसआयटीमार्फत (विशेष कृती दल) चौकशी करण्यास रत्नागिरी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी सुरुवात केली आहे.

प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर झालेल्या अत्याचाराविरोधात मंगळवारी पुन्हा आंदोलन छेडण्यात आले. रत्नागिरी जिल्हा सिव्हील रुग्णालयाच्या बाहेर विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून व परिचारिकांकडून हे शांततेत आंदोलन करण्यात आले. या लैंगिक अत्याचारप्रकरणी रत्नागिरीकरांच्या जनभावना तीव्र आहेत.

दोन जण ताब्यात

एसआयटीच्या तपासात सीसीटीव्हीच्या आधारे संबंधित रिक्षाची ओळख पटली आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपीला लवकरच पोलीस गजाआड करतील, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकाळी स्पष्ट केले.

अत्याचार झालेल्या तरुणीचा वैद्यकीय अहवाल मिळाल्यानंतर पुढील तपासाला दिशा मिळेल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

रत्नागिरी उद्यम नगर येथील चंपक मैदानावर बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या या तरुणीमुळे रत्नागिरीतील वातावरण मंगळवारी दुसऱ्या दिवशीही पेटले असून सोमवारी रात्री नागरिकांनी सिव्हील रुग्णालयाच्या बाहेरील मुख्य रस्त्यावर आंदोलन करून रस्ता रोको केला.

संतप्त जमावाने रुग्णालयात घुसण्याचाही प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना शांत करून रोखले. रस्ता रोकोनंतर पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीमुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. रत्नागिरीकरांचा वाढलेला उद्रेक पाहता सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सिव्हील हॉस्पिटलमध्ये जाऊन पोलिसांना जाब विचारीत आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली.

रत्नागिरीत खाजगी रुग्णालयात नर्सिंगचा अभ्यास करणारी तरुणी सकाळी देवरुख येथील आपल्या घरातून रत्नागिरीला आली. तेथून ती रुग्णालयात जाण्यासाठी रिक्षात बसली. त्यानंतर ती बेशुद्ध अवस्थेत चंपक मैदान येथे सापडली. ही घटना वाऱ्यासारखी रत्नागिरीत पसरली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो रत्नागिरीकरांनी व सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी सिव्हील रुग्णालयात धडक दिली. चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी त्यानंतर आमदार राजन साळवी व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली व पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली