संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

...तर शिवसेना का फोडली; बाळासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय यांचा पक्ष एक इंचही पुढे जात नाही: संजय राऊतांचा अमित शहांवर पलटवार

Maharashtra assembly elections 2024 : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतल्याशिवाय यांचा पक्ष एक इंचही पुढे सरकत नाही, असा पलटवार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर केला आहे.

Swapnil S

मुंबई : वीर सावरकर, बाळासाहेब यांच्याविषयी काँग्रेस नेत्यांच्या मनात प्रेम असेल तर दोन शब्द यांच्याविषयी बोलण्यास सांगा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना केले होते. शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी प्रेम आहे आणि भाजपपेक्षा हे दोन्ही पक्ष नक्कीच चांगले आहेत. प्रत्येक ठिकाणी बाळासाहेबांच्या नावाचा वापर करणाऱ्या अमित शहा यांना बाळासाहेबांबद्दल प्रेम, आदर असता तर शिवसेना का फोडली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतल्याशिवाय यांचा पक्ष एक इंचही पुढे सरकत नाही, असा पलटवार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर केला आहे.

२०१९ च्या निवडणुकीत एकत्र लढणारे दोन राजकीय पक्ष अज राजकीय शत्रू झाले आहेत. त्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे सगळेच राजकीय पक्ष एकमेकांवर तुटून पडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवार १० नोव्हेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अमित शहा यांनीही पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.‌ उद्धव ठाकरे आज कोणाबरोबर बसलेत हा त्यांचा प्रश्न. पण काँग्रेस नेत्यांना सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल दोन शब्द बोलण्यास सांगा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांना केले. शहा यांच्या बोलण्याचा समाचार घेत, बाळासाहेब ठाकरेंवर इतके प्रेम होते, तर आपण शिवसेना फोडली नसती.

बाळासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रात यांचा पक्ष एक इंच पुढे सरकू शकू शकत नाही. त्याच बाळासाहेबांची शिवसेना आपण फोडली, माणसं विकत घेतली त्याला तुम्ही प्रेम समजता का? असा सवाल यावेळी राऊतांनी केला.

तुम्ही का देत नाही भारतरत्न?

वीर सावरकरांच्या विषयी नसती उठाठेव करू नका. तुम्ही भारतरत्न का देत नाही ते सांगा. १० वर्षांपासून सांगत आहोत की, सावरकरांना भारतरत्न द्या आणि त्यांचा सन्मान करा. सावरकरांना भारतरत्न देणे अमित शहांच्या हातात आहे. मात्र महाराष्ट्राबद्दल यांच्या मनात सुडाची भावना, असा टोला राऊत यांनी लगावला.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात