संग्रहित छायाचित्र  एएनआय
महाराष्ट्र

शिंदे गटाचे काही आमदार ठाकरे गटात परतण्यास इच्छुक - सचिन अहिर

Swapnil S

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय घडामोडी वेगाने घडायला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे काही आमदार पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याच्या मन:स्थितीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनीदेखील याला दुजोरा दिला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिंदे गटात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या मतदारसंघात, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आता आपले सरकार जाणार ही भीती त्यांच्या मनात असू शकते. हे स्वाभाविक आहे. लोकसभा निवडणुकांच्या वेळीदेखील शिंदे गटातील काही आमदारांनी ठाकरे गटाशी संपर्क साधला होता. आम्ही लोकसभेला तुम्हाला मदत करू, पण विधानसभेला आम्हाला संधी द्या, अशी विनंती काही आमदारांनी केल्याचे सचिन अहिर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. या आमदारांची संख्या १६ किंवा २० कदाचित ४० ही असू शकते, असेही अहिर म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मात्र शिंदे गटातील आमदारांसाठी आमचे दरवाजे बंद असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. मात्र, राजकीय परिस्थितीचा विचार करता ज्या आमदारांनी शिंदे गटात जाऊनही कधी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कटु शब्दांत टीका केली नाही, अशा काही आमदारांचा विचार होऊ शकतो, अशी शक्यता आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस