दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना दिलासा; परीक्षा शुल्क न घेण्याच्या राज्य मंडळाच्या सूचना 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना दिलासा; परीक्षा शुल्क न घेण्याच्या राज्य मंडळाच्या सूचना

राज्यातील दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांमधील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांमधील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. या निर्णयानुसार राज्य मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी बारावी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा शुल्क न घेता ऑनलाईन आवेदनपत्रे भरून घेण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत.

मदत व पुनर्वसन विभागाच्या २५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने विशेष बाब म्हणून विविध सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीचाही समावेश आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दुष्काळाचे संकट गडद; आणखी चार तालुक्यांत दुष्काळ घोषित, राज्यात अन्य तालुक्यांचेही ग्राऊंड सर्वेक्षण होणार

स्मृतिदालनाचे लोकार्पण, नव्या वादाची चिन्हे; बाळासाहेबांबद्दल खरी निष्ठा, प्रेम असलेल्या व्यक्तीच्या हस्तेच लोकार्पण - उद्धव ठाकरे

आता सीसीटीव्हीचा मुद्दा ऐरणीवर; अजित पवार अपघातप्रकरणी चाैकशीची मागणी

३ हजार ४२ धरणांमध्ये ६४ टक्केच पाणी; राज्यातील स्थिती चिंताजनक; गतवर्षाच्या तुलनेत पाणीसाठ्यात २६ टक्क्यांची घट

चीनला शह देण्याचे आखाडे; बळाच्या वापराने परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकतर्फी कृतींना ‘क्वाड’ परिषदेत विरोध