ज्येष्ठ नागरिक, वाहकामध्ये वादावादी; एसटीत स्वच्छता अधिभार लागू 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

ज्येष्ठ नागरिक, वाहकामध्ये वादावादी; एसटीत स्वच्छता अधिभार लागू

एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांकडून आजपासून दोन रुपये स्वच्छता अधिभार घेण्यात येत आहे. मात्र अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना सरकारने या आधी तिकीट भाड्यात १०० टक्के सवलत दिली असल्याने ते दोन रुपये अतिरिक्त देण्यास टाळाटाळ करत आहेत. यातून ज्येष्ठ नागरिक व वाहकांमध्ये वादावादी होत आहेत.

Swapnil S

मुंबई : एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांकडून आजपासून दोन रुपये स्वच्छता अधिभार घेण्यात येत आहे. मात्र अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना सरकारने या आधी तिकीट भाड्यात १०० टक्के सवलत दिली असल्याने ते दोन रुपये अतिरिक्त देण्यास टाळाटाळ करत आहेत. यातून ज्येष्ठ नागरिक व वाहकांमध्ये वादावादी होत आहेत.

एसटीच्या प्रत्येक प्रवाशांकडून आज रात्रीपासून दोन रुपये स्वच्छता अधिभार अतिरिक्त वसूल करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेले आहे. दररोज अडीच लाख अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवास करीत असून त्यांना दोन रुपये अधिभार लागणार आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे. त्याला विरोधही नाही. पण ज्येष्ठ अतिरिक्त पैसे देण्यास टाळाटाळ करत करत असल्याने वाद होत आहेत.

मध्यम मार्ग काढावा

याला पर्याय म्हणून यूपीआय पेमेंट घेऊन हा प्रश्न सोडवण्यात मदत होते; पण गेले आठवडा सर्व्हर डाऊन असल्याने प्रवाशांच्या खात्यातून पैसे कट होत असून ते एसटीच्या खात्यात जमा होण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे महामंडळाची ही स्वच्छता योजनात काही मध्यम मार्ग काढण्यात यावा, अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

एसटीचे २३ विभाग तोट्यात

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) राज्यात एकूण ३१ विभाग आहेत. यापैकी केवळ ८ विभाग सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात नफ्यात आहेत. मात्र उर्वरित २३ विभाग तोट्यात आहेत. त्यामुळे तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना राबवण्याचे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

एसटी मुख्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीला एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर उपस्थित होते. दैनंदिन सरासरी उत्पन्न ३१ कोटी ४० लाख रुपये असताना खर्च ३३ कोटी रुपये इतका झाला असून दररोज सुमारे १ कोटी ६० लाख रुपयांचा तोटा होत आहे.

'कोर्टाची दिशाभूल केली, आता परिणाम भोगा'; समय रैनाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, 'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणी ३ लाखांचा दंड

शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा समावेश; सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारची माहिती

Nashik : पर्यटक महिलेची छेड काढल्याचा जाब विचारताच कुटुंबावर हल्ला; पाठलाग करत कारची तोडफोड, VIDEO

Mumbai : कलाप्रेमींसाठी पर्वणी! पाहा 'काळा घोडा आर्ट अव्हेन्यू'ची खास झलक

Thane : 'अनधिकृत होर्डिंग्ज हटवा'; बॅनर दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश