महाराष्ट्र

डेपोमधून वाहकांना सुट्ट्या पैशांचा पुरवठा करा; एसटी महामंडळाचे निर्देश

एसटी प्रवासादरम्यान प्रवासी व वाहक यांच्यात सुट्ट्या पैशांवरून वाद होऊ लागले आहेत.

Swapnil S

मुंबई : एसटी प्रवासादरम्यान प्रवासी व वाहक यांच्यात सुट्ट्या पैशांवरून वाद होऊ लागले आहेत. प्रवाशांसोबतचे वाद टाळण्यासाठी महामंडळाने यूपीआयच्या माध्यमातून ऑनलाइन पेमेंटची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. यासोबतच महामंडळाने बस वाहकांना डेपोमधून सुट्ट्या पैशांचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे वाहक आणि प्रवाशांमधील वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने यूपीआय पेमेंटची सेवा उपलब्ध करून दिली आहे. भाडेवाढ झाल्यापासून या सेवेला प्रवाशांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. दैनंदिन यूपीआय पेमेंट दुपटीने वाढले आहे. या बरोबरच महामंडळाने एक परिपत्रक काढून वाहकांना ड्युटीवर जाताना डेपोमधून सुट्ट्या पैशांचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे वाहक व प्रवासी यांच्यामध्ये सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद टळतील, असा विश्वास महामंडळाने व्यक्त केला आहे.

भाडेवाढ सूत्रात बदलासाठी फेर प्रस्ताव पाठवावा

एसटीच्या नव्या भाडेवाढीमुळे प्रवासी व वाहक यांच्यात सुट्ट्या पैशांवरून दररोज बाचाबाची होऊ लागली आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर आगारातील नांदेड बुद्रुक या मार्गावर कामगिरी बजावणाऱ्या वाहकाला मारहाण झाल्याचा गुन्हा पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. भाडेवाढ झाल्यानंतर पाच दिवसांत अनेक ठिकाणी वाद झाल्याच्या घटना समोर आल्या असून खबरदारी म्हणून भाडेवाढ सूत्रात तत्काळ बदल करण्यासाठी एसटीकडून पुन्हा एकदा राज्य परिवहन प्राधिकरणाकडे फेर प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. नवीन भाडेवाढ ही पाच रुपयांच्या पटीत असावी, असा स्पष्ट प्रस्ताव एसटीने यापूर्वीच पाठवला होता. यानंतरही प्राधिकरणाने एक रुपयाच्या पटीत भाडेवाढ करण्याचा आदेश काढला असून सध्या चलनात सुट्ट्या पैशांचे व्यवहार जवळ जवळ बंद झाले आहेत, असेही बरगे म्हणाले.

राज्यभर पुन्हा मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर पावसाचे सावट

आझाद मैदानात उपोषण करण्यास HC ची मनाई; पण जरांगे-पाटील मुंबईत येण्यावर ठाम; म्हणाले - "कोर्ट आम्हाला १०० टक्के...

मराठा आरक्षण : मनोज जरांगे-पाटलांना हायकोर्टाचा धक्का; परवानगीशिवाय आझाद मैदानात उपोषणास मनाई

'या रीलमध्ये चुकीचं काय?' रोहित पवारांकडून अथर्व सुदामेची पाठराखण; 'तो' व्हिडिओही पुन्हा केला शेअर

विवाहित लेकीला प्रियकरासह नको त्या अवस्थेत पकडले; बापाने दोघांनाही विहिरीत ढकलून संपवले, धक्कादायक घटनेने नांदेड हादरले