महाराष्ट्र

‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ योजना यशस्वी, ४ लाख ३ हजार २९४ विद्यार्थ्यांना दिले पास; उत्पन्न २६ कोटींनी वाढले

शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटीचे पास त्यांच्या शाळेत वितरित करण्याची योजना १८ जूनपासून सुरू करण्यात आली. ही योजना यशस्वी ठरली आहे.

Swapnil S

मुंबई : शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटीचे पास त्यांच्या शाळेत वितरित करण्याची योजना १८ जूनपासून सुरू करण्यात आली. ही योजना यशस्वी ठरली असून केवळ १२ दिवसात ४ लाख ३ हजार २९४ विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवास पास वितरीत केले आहेत. ही संख्या मागील वर्षाच्या जून महिन्याच्या तुलनेत सुमारे ८३ हजारांनी जास्त आहे. यामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न २६ कोटीं रुपयांनी वाढले आहे.

एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी यंदापासून शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन पास वितरीत करण्याची योजना सुरू केली. त्यानुसार प्रत्येक आगारातील कर्मचारी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक शाळा महाविद्यालयात जाऊन तेथील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार प्रवासी पास वितरण करू लागले आहेत. या योजनेला केवळ १२ दिवसांमध्ये उदंड प्रतिसाद मिळाला असून जुलै महिन्यातदेखील अशाच पद्धतीने एसटी कर्मचारी थेट शाळेत जाऊन पास वितरण करत आहेत.

१५ जूनपासून नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६ टक्के इतकी सवलत दिली आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहून पास घ्यावे लागत होते. पण यंदापासून विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा-महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येत आहेत. जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही.

चला, चला दिवाळी आली; खरेदीची वेळ झाली! मुंबईतील बाजारपेठांमध्ये ‘शॉपिंग’साठी तोबा गर्दी

वांद्रे टर्मिनसमध्ये चेंगराचेंगरी; जागा पकडण्यातून दुर्घटना, १० प्रवासी जखमी, गर्दीमुळे 'या' स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी

याद्यांचा धडाका! महायुती व महाविकास आघाडीचे बहुतांश उमेदवार जाहीर

जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळणार; केंद्राची सहमती; हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार

जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य : वसंत देशमुख यांना पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात