File photo 
महाराष्ट्र

बोरिवली ते मांडवा एसटी बससेवा सुरू करा

एस.व्ही रोडमार्गे या बसचा येण्याजाण्याचा प्रवास सुरू होता. मधल्या काळात ही सेवा सुरू असताना उशिराने बस धावण्याच्या तक्रारी प्रवाशांकडून येत होत्या

नवशक्ती Web Desk

गेल्या अनेक वर्षांपासून नियमित सुरू असणारी बोरिवली-मांडवा एसटी बससेवा अचानक बंद करण्यात आली आहे. एस.व्ही रोडमार्गे या बसचा येण्याजाण्याचा प्रवास सुरू होता. मधल्या काळात ही सेवा सुरू असताना उशिराने बस धावण्याच्या तक्रारी प्रवाशांकडून येत होत्या. कधी वाहतुककोंडी तर कधी तांत्रिक बिघाडामुळे बस रद्द केल्या जायच्या. याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत होता. मात्र बोरिवली ते मांडवा एसटी बससेवा सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारी असल्याने तसेच सुरक्षित असल्याने वाहतूक सेवेत आवश्यक ते बदल करत ही सेवा सुरू ठेवावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, एसटी महामंडळाने वरील अडचणींचा विचार करत सदर एसटी बस सेवा दोन्ही बाजुकडील प्रवासाकरीता नियमीतपणे एस.व्ही.रोड.मार्गे सुरू ठेवावी, अशी मागणी समाजसेवक सुयोग सुरेश नाईक आणि राजेंद्र दामोदर घरत यांनी केली आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत