महाराष्ट्र

राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा; यजमान सांगलीचे चारही संघ उपांत्य फेरीत, पुरुष व महिला गटांत पुणे, मुंबई उपनगर यांचीही विजयी घौडदौड

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या मान्यतेने सांगली येथे सुरू असलेल्या कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत सांगलीच्या चारही संघांनी (पुरुष-महिला, किशोर-किशोरी) उपांत्य फेरी गाठली.

Swapnil S

सांगली : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या मान्यतेने सांगली येथे सुरू असलेल्या कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत सांगलीच्या चारही संघांनी (पुरुष-महिला, किशोर-किशोरी) उपांत्य फेरी गाठली. तसेच धाराशीव, पुणे, मुंबई उपनगर यांनीही आगेकूच केली.

अकूज ड्रीमलँड येथे खेळवण्यात येत असलेल्या या स्पर्धेत किशोरी गटात ठाण्याने नागपूरचा १४-९ असा पराभव केला. प्रणिती जगदाळे (२.३० मिनिटे संरक्षण व आक्रमणात ३ गडी), नेहा हलगरे (१.४० मि.) यांनी चमक दाखवली. किशोर गटात सांगलीने बुलढाण्यावर ११-७ असा विजय मिळवला. श्री दळवी (४ मि., ३ गडी), रितेश बिरादार (२.१० मि.) यांनी छाप पाडली.

महिला गटात पुण्याने नाशिकवर १०-८ अशी मात केली. प्रियांका इंगळे (४ मि.), स्नेहल जाधव (२.२० मि.), काजल भोर (१.४० मि., ४ गडी) या त्रिकुटाला विजयाचे श्रेय जाते. सांगलीने साताऱ्यावर ११-८ असे १ डाव व ३ गुणांच्या फरकाने वर्चस्व गाजवले. प्रतीक्षा बिराजदार (४.१० मि., २ गडी), सानिका चाफे (२.२० मि., ३ गडी) यांनी अफलातून कामगिरी केली. कोल्हापूरने मुंबई उपनगरवर १०-६ असे प्रभुत्व मिळवले.

पुरुषांच्या गटात मुंबईउपनगरने धाराशीववर १८-१४ अशी सरशी साधली. मग त्यांनी उपांत्यपूर्व लढतीत मुंबई शहरचा २१-१३ असा धुव्वा उडवला. अनिकेत चेडवणकर (२ मि., १ गडी), धीरज भावे (१.५० मि.), निखिल सोडये (२.५० मि., ३ गडी) यांना विजयाचे श्रेय जाते. ठाण्याने कोल्हापूरला २०-१९ असे अवघ्या एका गुणाच्या फरकाने नमवले. आकाश साळवे, संकेत कदम त्यांच्यासाठी चमकले. सांगलीने सोलापूरला १८-११ असे नामोहरम केले. सौरभ घाडगे (३ मि., ३ गडी), अक्षय मासाळ (२ मि., ३ गडी) यांनी उत्तम योगदान दिले.

उपांत्य फेरीतील सामने

  • किशोरी गट : सांगली वि. सोलापूर, कोल्हापूर वि. धाराशीव

  • किशोर गट : सांगली वि. पुणे, सातारा वि. ठाणे

  • पुरुष गट : सांगली वि. पुणे, मुंबई उपनगर वि. ठाणे

  • महिला गट : सांगली वि. पुणे, कोल्हापूर वि.

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती