महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची चोरी; रोहित पवारांनी केली 'ही' मागणी

प्रतिनिधी

उत्तर अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅन जोस शहरातील उद्यानातुन छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. ही बातमी समजताच महाराष्ट्रातून यासंदर्भात तीव्र भावना उमटू लागल्या. पुणे शहराने ‘सिस्टर सिटी’ मोहिमेअंतर्गत अमेरिकेतील सॅन जोस शहराला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिला होता. अशामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत मागणी केली आहे.

रोहित पवार ट्विटमध्ये म्हणाले की, पुणे शहराने अमेरिकेतील सॅन जोस शहराला ‘सिस्टर सिटी’ मोहिमेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिला होता. हा पुतळा सॅन जोस शहरातील उद्यानामध्ये बसवण्यात आलेला होता. पण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याची झालेली चोरी संतापजनक आहे. हा जगभरातील मराठी जनतेच्या भावनेचा विषय आहे. याबाबत लवकर तपास करून दोषींवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने भारतीय परराष्ट्र खात्याकडे करावी," अशी विनंती केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी सॅन जोस शहराला पुणे शहराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिला होता. दोन्ही शहरांमध्ये अनेक साम्य आहेत. दोन्ही शहरांना समुद्ध वारसा आणि इतिहास लाभला आहे. दोन्ही शहरे शिक्षणाचे केंद्र आहेत. त्यामुळे सॅन जोस या शहराची ओळख पुणे 'सिस्टर सिटी' म्हणून झाली. पुणे शहराने दिलेला हा पुतळा उत्तर अमेरिकेतला एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा