अहमदाबादहून चोरीस गेलेली कार जळगावात जप्त 
महाराष्ट्र

अहमदाबादहून चोरीस गेलेली कार जळगावात जप्त

गुजरातमधील अहमदाबाद येथून चोरीस गेलेली सुमारे ९ लाख रुपये किमतीची कार जळगाव पोलिसांनी थरारक पाठलाग करून जप्त केली. एमआयडीसी पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतल्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही कार गुजरात पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली.

Swapnil S

जळगाव : गुजरातमधील अहमदाबाद येथून चोरीस गेलेली सुमारे ९ लाख रुपये किमतीची कार जळगाव पोलिसांनी थरारक पाठलाग करून जप्त केली. एमआयडीसी पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतल्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही कार गुजरात पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली.

अहमदाबाद ग्रामीण हद्दीतील बोपल पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून १५ एप्रिल रोजी ही कार चोरीला गेली होती. याप्रकरणी तेथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, १८ जून रोजी सायंकाळी ही चोरीची कार जळगावच्या दिशेने येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वाहतूक शाखेच्या पथकाने काशिनाथ चौक येथे नाकाबंदी केली.

पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिल्यानंतरही चालकाने कार न थांबवता ती भरधाव वेगाने अजिंठा चौफुलीकडे पळवली. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून अजिंठा चौफुली येथे कार अडवली आणि चालकाला ताब्यात घेतले.

IIT Bombay मध्ये छतावरील पंख्यांऐवजी भिंतीवरचे पंखे

Jalgoan : विद्यार्थ्यांच्या मनात पेटणार ‘ज्योती’; २८ जिल्ह्यांतील १ हजार ८०० शाळांमध्ये लघुपट दाखवणार

छत्रपती संभाजीनगर : मुकुटबन-गडचांदूर रेल्वेमार्गासाठी ४९३ कोटींची मंजुरी

माझी प्रकृती उत्तम - सलमान खानचा खुलासा

हरित लवादाचे मोदी सरकारकडून खच्चीकरण; काँग्रेसचा आरोप, उद्योगांच्या बाजूने निकाल होत असल्याची तक्रार