महाराष्ट्र

अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक; गंभीर जखमी

राज्याचे माजी गृहमंत्री आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली असून त्यांच्या डोक्याला जबर मार बसला आहे. या हल्ल्यात अनिल देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काटोल-जलालखेड मार्गावरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तींकडून ही दगडफेक करण्यात आली.

Swapnil S

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली असून त्यांच्या डोक्याला जबर मार बसला आहे. या हल्ल्यात अनिल देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काटोल-जलालखेड मार्गावरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तींकडून ही दगडफेक करण्यात आली.

सोमवारी संध्याकाळी काटोल विधानसभा मतदारसंघामधील नरखेड येथील सांगता सभा आटोपल्यानंतर अनिल देशमुख तीनखेडा भिष्णूर मार्गाने परत येत होते. बेलफाट्याजवळील गतिरोधकावर, त्यांच्या कारची गती कमी झाली. त्याचा फायदा घेत, तोंडाला कापड बांधलेले तीन चार जण तेथे आले. त्यांनी कारवर दगडफेक केली. यात देशमुख यांच्या डोक्याला मार लागला. हा हल्ला होताच, देशमुख यांच्या कारमागे असलेल्या अन्य कारमधील कार्यकर्ते कारमधून बाहेर आले. त्यांना बघताच दगडफेक करणारे शेतातून पसार झाले. अनिल देशमुख यांनी मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला, असा आरोप केला आहे.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश