दादा भुसे संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

सरकारी शाळांतील विद्यार्थी गळती रोखणार; मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला विश्वास 

देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. यासाठी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे.

Swapnil S

मुंबई : देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. यासाठी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचण समजून घेत विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी शालेय शिक्षण विभाग रोड मॅप तयार करण्यात येईल. 

सरकारी शाळांतील विद्यार्थी गळती रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. 

नाशिक जिल्ह्यातील शासकीय व खासगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण मंत्रिपदाचा भुसे यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी ही उपस्थित होते. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळायला हवे यासाठी मंत्री म्हणून आपण आणि शालेय शिक्षण विभाग काम करणार आहे. शिक्षणातील सर्व अडचणी दूर करून येणाऱ्या काळात ‘रोड मॅप’ तयार केला जाईल. विद्यार्थी, पालक, शिक्षक, खासगी संस्था यांची येत्या आठ दिवसांत बैठक घेऊन त्यांचे मनोगत जाणून घेतले जातील. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची कमी होणारी संख्या, विद्यार्थी अभावी ओस पडणाऱ्या शाळांबाबत टप्प्याटप्प्याने उपाययोजना केल्या जातील. पालकांची मते यावेळी विचारात घेऊन शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर भर दिला जाईल. पालकांनी मात्र याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन भुसे यांनी केले.

लिबर्टी शोरूमने तुटलेल्या चप्पलीची वॉरंटी नाकारली; वाद थेट कोर्टात, मॅनेजरला होणार अटक

Google Update : जुना ईमेल आयडी बदलायचाय? आता गुगल देणार नवा पर्याय; जाणून घ्या नियम

रानडुक्कराचा वन विभागाच्या पथकावर हल्ला; अधिकारी गंभीर जखमी; Video व्हायरल

'तो स्पष्ट नाराज दिसतोय!'; एपी ढिल्लोंने ताराला Kiss केल्यानंतर वीर पहारियाची प्रतिक्रिया व्हायरल | Video

Mumbai : ChatGPT वापरून बनवला लोकल ट्रेनचा बनावट पास; भन्नाट आयडिया तरुणाच्या अंगलट