महाराष्ट्र

बारावी पुरवणी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवीला प्रवेश मिळणार ; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जारी केले आदेश

राज्यातील सर्व विद्यापीठांना पदवीच्या रिक्त जागांवर प्रवेश देण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदेश जारी केले आहेत.

नवशक्ती Web Desk

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारावी पुरवणी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी एक मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता बारावीच्या पुरवणी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला पदवीला प्रवेश घेता येणार आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांना पदवीच्या रिक्त जागांवर प्रवेश देण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदेश जारी केले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच् माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या मार्फत ऑगस्ट २०२३मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(HSC)पुरवणी परिक्षेचा ऑनलाईन निकाल सोमवारी (२८ ऑगस्ट) रोजी जाहीर झाला आहे. पुरवणी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या विद्यापीठांअर्गत महाविद्यालयामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम (विधी, बीएड आणि बीपीएड वगळून)

आणि पारंपारिक अभ्यासक्रमाकरिता(कला, विज्ञान आणि वाणिज्य) कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही. याची दक्षता घ्यावी, असा आदेश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

त्याच बरोबर या सर्व विद्यार्थ्यांच्या बाबतीत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार १८० शैक्षणिक दिवस भरतील याची दक्षता सर्व अकृषी विद्यापीठांनी घेण्याची विनंती देखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी