महाराष्ट्र

सुनेत्रा पवारांचा विक्रम! बारामतीत दोन लाख १८ हजारांच्या फरकाने ऐतिहासिक विजय; राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले विजयी

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विजयाचा नवा इतिहास रचला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी २ लाख १८ हजार ९३० असे विक्रमी मताधिक्य मिळवून एकतर्फी विजय संपादन केला. पोटनिवडणुकीच्या असलेल्या अभिजित बिचुकले आणि करुणा मुंडे यांसारख्या रिंगणात उमेदवारांना मतदारांनी पूर्णपणे नाकारल्याचे दिसून आले.

Swapnil S

पुणे : बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विजयाचा नवा इतिहास रचला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी २ लाख १८ हजार ९३० असे विक्रमी मताधिक्य मिळवून एकतर्फी विजय संपादन केला. पोटनिवडणुकीच्या असलेल्या अभिजित बिचुकले आणि करुणा मुंडे यांसारख्या रिंगणात उमेदवारांना मतदारांनी पूर्णपणे नाकारल्याचे दिसून आले.

हा विजय केवळ एका उमेदवाराचा बारामतीकरांनी नसून दिवंगत अजितदादांच्या नेतृत्वावर व्यक्त केलेली ही खरी 'भावांजली' असल्याची भावना यावेळी सुनेत्रा पवार पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

शरद पवार आणि त्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीवर पवार कुटुंबाचे निर्विवाद वर्चस्व राहिले असून, आता सुनेत्रा पवार यांच्याकडे विकासाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. १९६२ मध्ये निवडून आलेल्या मालतीबाई शिरोळे यांना जनता प्रेमाने 'माई' म्हणत असे, तर सुनेत्रा पवार यांना बारामतीची जनता गेल्या तीन दशकांपासून 'वहिनी' या नावाने ओळखते. 'माई'नंतर आता 'वहिनी' च्या रूपाने बारामतीला पुन्हा एकदा तोच मायेचा ओलावा अनुभवायला मिळणार असल्याची मतदारांमध्ये आहे. भावना

राहुरीत एकतर्फी लढत

राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतही एकतर्फी लढत पाहायला मिळाली. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अक्षय कर्डिले हे १ लाख १२ हजार ५८७इतक्या विक्रमी मतांनी विजयी झाले. इतर सर्व ६ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. विजय जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर गुलाल उधळून जल्लोष केला. अक्षय कर्डिले यांनी १ लाख ४० हजार ९३ मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांचा पराभव केला आहे. गोविंद मोकाटे यांना २७ हजार ५०६ मते पडली.

या विजयामुळे बारामतीच्या राजकारणात तब्बल ६४ वर्षांनंतर एका महिलेच्या हाती सत्तेची सूत्रे आली आहेत. १९६२ मध्ये मालतीबाई शिरोळे (माई) या बारामतीच्या पहिल्या महिला आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर आता २०२६ मध्ये सुनेत्रा पवार या बारामतीच्या दुसऱ्या महिला आमदार ठरल्या आहेत. मालतीबाई शिरोळे यांनी १९६७ पर्यंत बारामतीचे प्रतिनिधित्व केले होते आणि त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या मतदारसंघाची धुरा सांभाळली होती.

जल्लोष नाही

इतक्या मोठ्या विजयानंतरही बारामतीत कुठेही गुलाल उधळला गेला नाही किंवा विजयोत्सव साजरा करण्यात आला नाही. सुनेत्रा पवार आणि त्यांचे चिरंजीव जय पवार यांनी कार्यकर्त्यांना कोणताही जल्लोष न करण्याची विनंती केली होती. 'विजयी आनंदाचा दिवस साजरा करण्यापेक्षा दादांना आदरांजली वाहण्याचा क्षण आहे,' असे जय पवार म्हणाले. तसेच भोर तालुक्यात एका चिमुकलीसोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे पवार कुटुंब दुःखात असून, त्या कुटुंबाला न्याय मिळवून देणे ही आपली प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातील वाटचालीबाबत बोलताना जय पवार यांनी स्पष्ट केले की, बारामतीकरांना आधार देण्यासाठी ते दर गुरुवारी बारामतीमध्ये 'जनता दरबार' घेणार आहेत. आचारसंहितेमुळे रखडलेले ग्रामीण भागातील प्रश्न, विशेषतः टँकर आणि पाणीटंचाईच्या समस्या तातडीने सोडवण्यावर आपला भर असेल, असे त्यांनी नमूद केले.

एनडीएची घोडदौड कायम राहील...

या विजयासोबतच सुनेत्रा पवार यांनी देशातील राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी मोदींचे अभिनंदन केले आणि एनडीएची ही घोडदौड कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला.

सुनील कुमार शर्माचा विक्रम मोडला

आतापर्यंत देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा राष्ट्रीय विक्रम उत्तर प्रदेशातील साहिबाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कुमार शर्मा यांच्या नावावर होता. त्यांनी २०२२ च्या निवडणुकीत २ लाख १४ हजार ८३५ मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. सुनेत्रा पवार यांनी तो मागे टाकला आहे.

'सुनेत्रापर्व', नव्या विकासपर्वाची सुरुवात - सुनिल तटकरे

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन केले आहे. या विजयावर भाष्य करताना त्यांनी 'सुनेत्रापर्वा'च्या रूपाने बारामतीमध्ये एका नव्या विकासपर्वाची सुरुवात झाल्याचे म्हटले आहे.

सुनेत्रा झाल्या भावूक

विजयानंतर माध्यमांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार अत्यंत भावूक झाल्या होत्या. 'अजितदादांनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे आणि मला अशा परिस्थितीला सामोरे जावे लागेल असे कधीच वाटले नव्हते,' असे त्यांनी जड अंतःकरणाने नमूद केले. बारामतीकरांनी दिलेले हे प्रचंड मतदान म्हणजे दादांनी केलेल्या विकासकामांची पावती आहे. शरद पवार, अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांच्या सातत्यपूर्ण सेवेचा हा परिणाम असल्याचे सांगत त्यांनी पवार कुटुंब आणि बारामतीकरांचे आभार मानले.

पॅलेट गन प्रकरणात FIR ची मागणी; पीडित विद्यार्थ्यासह राहुल गांधींचे पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन

जयपूरमध्ये शाळेच्या पाहणीदरम्यान CJP कार्यकर्त्यांवर हल्ला; धक्काबुक्की अन् गाड्यांची तोडफोड, Video व्हायरल

Mumbai : कुर्ल्यात पहाटे मोठी दुर्घटना! क्रेनचा भाग झोपड्यांवर कोसळला; ३ महिन्यांच्या बाळासह १० जण जखमी, VIDEO

ठाण्यातील कोलशेतमध्ये धूळ-माती, चिखलाचा कहर; बड्या विकासकांना महापालिकेचा दणका, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

ST च्या भाडेवाढीचा गणेशभक्तांना फटका; तीव्र आंदोलन करण्याचा इशारा