पूजा खेडकर संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा; अटक तूर्त टळली

माजी प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरता दिलासा दिला.

Swapnil S

नवी दिल्ली : माजी प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरता दिलासा दिला. नागरी सेवा परीक्षेत ओबीसी प्रवर्ग आणि अपंगत्व कोट्याच्याअंतर्गत आरक्षणाचा लाभ घेतल्याप्रकरणी कोर्टाने पूजा खेडकरच्या अटकेला १४ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पूजा खेडकरची अटक टळली आहे.

न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जाबाबत दिल्ली सरकार आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाला नोटीस पाठवली आहे.

पूजा खेडकरच्यावतीने युक्तिवाद करणारे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा यांनी सांगितले की, पूजाविरुद्ध उच्च न्यायालयाच्या आदेशात काही गंभीर बाबी आढळल्या आहेत. या प्रकरणात खटला चालवला गेला तर, उच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद केलेल्या निष्कर्षांमुळे ती दोषी ठरण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी नागरी सेवा परीक्षा २०२२ साठी आपल्या अर्जात चुकीची माहिती दिल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर आयएसएस अधिकारी म्हणून पूजा खेडकरची निवड रद्द करण्यात आली आहे. इतकेच नव्हे भविष्यात पूजा खेडकरवर पुन्हा नागरी सेवा आयोगाच्या परीक्षेला बसण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

अनेक गुन्ह्यांमध्ये एफआयआर

चुकीच्या पद्धतीने कोट्याचा लाभ घेण्यासाठी बनावट ओळख सादर केल्याच्या प्रकरणात पूजा खेडकरविरुद्ध केंद्रीय लोकसेवा आयोगाने अनेक गुन्ह्यांमध्ये एफआयआरही दाखल केला आहे. केंद्र सरकारने पूजा खेडकरच्या निवड प्रक्रियेचा तपास करण्यासाठी एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. मात्र, पूजा खेडकरने तिच्या विरोधातील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश