आमचा कोणताही गट नसून आम्हीच पूर्ण पक्ष; खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन 
महाराष्ट्र

आमचा कोणताही गट नसून आम्हीच पूर्ण पक्ष; खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन

आमचा कोणताही स्वतंत्र गट नसून आम्हीच पूर्ण पक्ष आहोत, असे ठाम प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केले. परिसीमन विधेयकाची प्रत अद्याप पक्षाला मिळालेली नाही.

Swapnil S

पुणे : आमचा कोणताही स्वतंत्र गट नसून आम्हीच पूर्ण पक्ष आहोत, असे ठाम प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केले. परिसीमन विधेयकाची प्रत अद्याप पक्षाला मिळालेली नाही. ती मिळाल्यानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून अधिकृत भूमिका जाहीर केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

परिसीमन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे खासदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या आरोपांवर सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. विधेयकाचा मसुदा किंवा प्रत अद्याप प्राप्त झालेली नसल्याने त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. प्रत मिळाल्यानंतर पक्षाची भूमिका स्पष्ट केली जाईल, असे त्या म्हणाल्या. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याबाबतही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेशी सहमती दर्शवत सुळे यांनी शेवटच्या घटकापर्यंत सरकारी मदत पोहोचविण्याची मागणी केली. आपण दर आठवड्याला मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेत असून, जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून मदतीसाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

पाठिंबा देणे म्हणजे भाजपशी हातमिळवणी नव्हे

परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयकाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुळे यांच्या भूमिकेचे स्वागत केले. सर्व राज्यांमध्ये समान प्रमाणात लोकसभेच्या जागा वाढणार असतील, तर विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका योग्य असल्याचे ते म्हणाले. देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता लोकसभा आणि विधानसभा जागांमध्ये वाढ होणे आवश्यक आहे. मात्र, एखाद्या विधेयकाला पाठिंबा देणे म्हणजे भाजप किंवा एनडीएशी हातमिळवणी करणे असा अर्थ काढणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Borivali- Virar Railway : विस्तारीकरणासाठी रेल्वेचे PVD तंत्रज्ञान; जमिनीच्या मजबुतीकरणाचा कालावधी सहा महिन्यांवर

भारतात येत्या नऊ वर्षात २० कोटी एअर कंडिशनर वाढणार; जागतिक ऊर्जा मागणीत घडणार मोठा बदल

मीरा-भाईंदरच्या परिवहन ताफ्यात ४२ वातानुकूलित ई-बसेस दाखल; RTO नोंदणी प्रक्रिया सुरू; लवकरच प्रवाशांच्या सेवेत धावणार

Mumbai : 'त्या' उद्यान कंत्राटदाराला लाखाचा दंड

Mumbai : उद्यानात पोलीस गस्त, सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक मागणीला केराची टोपली; उद्यान समिती अध्यक्षांचे पत्र दुर्लक्षितच