महाराष्ट्र

"उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्त्वाकांक्षा"; सुषमा अंधारेंचा उदय सामंतांवर निशाणा

शिवसेना उबाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर टीकास्त्र डागले.

किशोरी घायवट-उबाळे

राज्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळी एकमेकांवर टीका करताना दिसून येतायेत. अशातच, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. उदय सामंत यांनी एका मराठी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत शिवसेना उबाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला. उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्त्वाकांक्षा मी उघड केल्याने एका अर्थी तुमचे मनसुबे उधळल्यासारखे झाले आहेत का? असा सवाल करत सुषमा अंधारेंनी सामंतांवर टीकास्त्र डागले.

"सुषमा अंधारे यांनी दिल्लीत खासदार नरेश म्हस्के यांची भेट घेतली होती. तसेच त्या आमच्या पक्षात प्रवेश करणार होत्या" असा खळबळजनक दावा उदय सामंत यांनी केला. त्यावर सुषमा अंधारे यांनी X च्या माध्यमातून "तुम्हाला राजकीय क्षेत्रात जे स्थान दिले ते ठाकरेंनी दिले" असा पलटवार केला.

उदयभाऊ, आपण सत्तेसाठी कुणासोबतही जाऊ शकता!

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उदय सामंत यांच्या राजकीय कारकिर्दीवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, "प्रिय उदयभाऊ, आज एका जाहीर कार्यक्रमांमध्ये तुम्ही शिंदेंमुळे दखलपात्र झाला आहात हे मान्य केले.पण सगळ्यात आधी तुम्हाला राजकीय क्षेत्रात जे स्थान दिले ते ठाकरेंनी दिले! त्यानंतर आपली एक धुरंधर राजकारणी म्हणून ओळख राष्ट्रवादीने तयार केली! तिथून आपण शिवसेनेत येऊन आपण एक मुत्सद्दी राजकारणी आहात हे सिद्ध केले! शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाताना आपण सत्तेसाठी कुणासोबतही जाऊ शकता हे सिद्ध केले." असा दावा अंधारेंनी केला.

यासोबतच, "उदयभाऊ , आता उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी उघड केल्याने एका अर्थी तुमचे मनसुबे उधळल्यासारखे झाले आहेत का? माझ्यामुळे आपल्या सुप्त इच्छा जगजाहीर झाल्या आहेत का? कदाचित त्यामुळेच आपण आज वैतागून माझी आणि नरेश म्हस्के यांची भेट झाल्याचे मुलाखतीत सांगत होतात." असे म्हणत अंधारेंनी सामंतांना टोला लगावला.

"होय माझी आणि नरेश म्हस्के यांची नक्की भेट झाली. भेट घेतली नाही; भेट झाली. दिल्ली महाराष्ट्र सदनच्या उपहारगृहामध्ये चहासाठी बसल्यानंतर भेट झाली. माझ्यासमवेत माझ्या पक्षाचे खा . भाऊसाहेब वाकचौरे असताना बाजूला खा. भगरे गुरुजी असताना आणि समोर अनेक वृत्तवाहिन्यांचे पत्रकार बसलेले असताना माझी भेट झाली. विशेष ही भेट झाल्यावर मी सगळ्यात आधी माझ्या पक्षप्रमुखांना ही माहिती दिली हे कदाचित आपल्याला माहित नसेल. पण तरीही मी समजूच शकते." असे म्हणत सुषमा अंधारेंनी उदय सामंत यांना प्रत्युत्तर दिले.

पुढे त्या म्हणाल्या, "उदय भाऊ, आता तिथूनही तुम्ही फुटून निघण्याच्या तयारीत आहात! आणि नेमकं तुमच्या याच दुखऱ्या नसेवर मी बोट ठेवलं तेव्हा तुम्ही कळवळून माझ्याबद्दल अतिशय सहज स्वाभाविक घडलेल्या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. पण उदय भाऊ, आपला वार अगदीच बेकार गेला आहे. पण या निमित्ताने का असेना माझं बोलणं हे तुमच्या फार जिव्हारी लागलंय हे लक्षात आलंय." अशी टीका करत सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांना राखी बांधत असतानाच फोटो त्यांच्या पोस्टमध्ये जोडला आहे. मी काही सांगण्यापेक्षा हा फोटो जास्त बोलका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, तुमच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला तेवढं आम्हालाही बोलवा बर का! असा मिश्किल टोलाही त्यांनी सामंतांना लगावला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दुराव्यावर एकनाथ शिंदेंनी सोडलं मौन; "तुम्ही सगळे फक्त ब्रेकिंग न्यूजसाठी...

गौरी गर्जे प्रकरण : आत्महत्या की हत्या? प्रेयसी गरोदर, अफेअर लपवण्यासाठी ब्लॅकमेलिंग; कुटुंबियांचे अनंत गर्जेवर गंभीर आरोप

१० महिन्यांचा संसार, नवऱ्याचे अनैतिक संबंध, शेवटी टोकाचं पाऊल; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या

चोरीच्या संशयावरून १४ वर्षाच्या मुलासोबत राक्षसी कृत्य; लोखंडी बैलगाडीला बांधलं, खालून आग लावली, धुळ्यातील संतापजनक घटना

पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रास्त्र रॅकेटचा पर्दाफाश, ३६ जण ताब्यात