जळगाव : मंगळवारी रात्री निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर वाळू माफियांनी केलेल्या हल्ल्यानंतर महसूल अधिकारी व कर्मचारी संतप्त झाले असून, त्यांनी वाळू माफियांविरोधत मोक्क्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जळगाव जिल्ह्यात वाळू उपशला परवानगी नसली तरी मोठया प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू आहे. मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता नशिराबाद जवळ निवासी उपजिल्हाधिकारी सोपान पाटील यांनी वैध वाळू वाहतूक करीत असलेले डंपर पकडल्यावर काही वेळात एका कारमधून सात ते आठ जणांनी येऊन त्यांच्यावर भीषण हल्ला चढवला. लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत ते जबर जखमी झााले असून, त्यांना शासकीय वैदयकीय महाविदयालयाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याचे पडसाद महसूल विभागात उपटले असून, या हल्ल्याविरोधात महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देत वाळू माफीयांविरोधात मोक्क्का लावण्याची मागणी केली आहे.
निवेदनात जिल्हयात अवैध गौण खनिजाविरोधात कारवाई करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर हल्ल्याचे प्रमाण वाढत चालले असल्याचे नमूद करत आता निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे वाळूमाफीयांना आता कायद्याचा धाक राहिलेला नाही, हे सिध्द होते. सर्व आरोपींवर पोलीस विभागामार्फत मोक्क्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी आयुक्त राधाकृष्णा गमे यांच्याकडे केली आहे.