महाराष्ट्र

राज्यात २ पदवीधर, ३ शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला सुरुवात

निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अनेक उमेदवार हे अपक्ष असून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक अशा एकूण ५ मतदारसंघातील निवडणुकीचे मतदान आज पार पडत आहे. अशामध्ये नाशिक मतदारसंघाकडे साऱ्यांचे लक्ष लागले असून कोण बाजी मारणार याची सर्वानांच उत्सुकता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये पहिल्या २ तासांत ७ टक्के मतदान झाल्याची माहिती देण्यात येत आहे.

मराठवाडा शिक्षक मतदार संघासाठी सकाळी ८ वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक मतदार मतदानासाठी रांगा लावून उभे होते. तर, नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी तब्बल २२ उमेदवार लढत आहेत. तर, गडचिरोलीमध्येही शिक्षक मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला. विशेष म्हणजे सकाळी पहिल्या २ तासांमध्ये तब्बल १२.८६ टक्के मतदान झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री