संग्रहित छायाचित्र  
महाराष्ट्र

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना खुशखबर; खासगी विनाअनुदानित शिक्षकांना टप्पा अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा

राज्यातील खासगी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना टप्पा अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील ६ हजार ७५ शाळा व ९ हजार ६३१ तुकड्यांमधील ४९ हजार ५६२ शिक्षकांना वेतन अनुदानाचा पुढील टप्पा देय करण्याचा निर्णय १७ जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यातील खासगी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना टप्पा अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील ६ हजार ७५ शाळा व ९ हजार ६३१ तुकड्यांमधील ४९ हजार ५६२ शिक्षकांना वेतन अनुदानाचा पुढील टप्पा देय करण्याचा निर्णय १७ जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. तसेच २, ७१४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नव्याने २० टक्के अनुदान देण्यास मंत्री मंडळाने मान्यता दिली आहे. १ ऑगस्टपासून याची अंमलबजावणी होणार आहे.

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी विधानसभेत या विषयी निवेदन सादर केले. दरम्यान, यासाठी ९७०.४२ कोटींच्या खर्चास मंत्री मंडळाने मान्यता दिल्याचे मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील खासगी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा तुकड्या व त्यावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान देण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. याबाबत गुरुवार १७ जुलै रोजी मंत्री मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत या प्रश्नावर चर्चा करण्यात आली असता मंत्री मंडळाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान देण्यावर शिक्कामोर्तब केले. तसेच अनुदानाच्या निकषानुसार अपात्र होणाऱ्या शाळा व तुकड्यांना स्वयं अर्थसहाय्यीत अधिनियमाच्या तरतुदीनुसार 'विवक्षित शाळा' म्हणून घोषित करण्यास मंत्री मंडळाने मान्यता दिल्याचे मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितले.

Mumbai : इमारतींना OC मिळण्याची प्रतीक्षाच! अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार, स्थायी समितीत प्रस्ताव मागे घेतला

"माझ्यावर हसताय?" म्हणत ग्राहकाचे दुकानदारावर चाकूने सपासप वार; मुंबईतील धक्कादायक घटना

एमआयएमच्या नगरसेविकेला धक्का! जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा समितीचा निर्णय; महापालिकेत राजकीय उलथापालथीची शक्यता

ठाण्यात पाणीटंचाई तीव्र होणार; धरणांतील साठा २८ टक्क्यांवर, मुंबईतील पाणी कपातीचा ठाण्यावर परिणाम?

Pune : सगळ्यांसमोर पतीला मारहाण; अपमानाचा मानसिक धक्का सहन न झाल्याने रिसेप्शनिस्ट महिलेचे टोकाचे पाऊल