एएनआय
महाराष्ट्र

भारत-पाक सामन्याला ठाकरे सेनेचा विरोध; ‘माझं कुंकू, माझा देश’ अभियान राज्यभर राबवणार

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या भारत-पाकिस्तान क्रिक्रेट सामना १४ सप्टेंबर रोजी दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडणार आहे. मात्र पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना नको, अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेने घेतली आहे. याचा निषेध करण्यासाठी सामन्या दिवशी पक्षाकडून राज्यभर ‘माझं कुंकू, माझा देश’ हे अभियान राबवले जाणार आहे.

Swapnil S

मुंबई : संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या भारत-पाकिस्तान क्रिक्रेट सामना १४ सप्टेंबर रोजी दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडणार आहे. मात्र पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना नको, अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेने घेतली आहे. या सामन्याचा निषेध करण्यासाठी सामन्याच्या दिवशी पक्षाकडून राज्यभर ‘माझं कुंकू, माझा देश’ हे अभियान राबवले जाणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

भारत-पाकिस्तान सामना लोकभावना डावलून घेतला जात आहे. पहलगाममध्ये २६ निरपराध लोकांची हत्या झाली असून त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश अजूनही संपलेला नाही. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया काश्मीरमध्ये सुरूच आहेत. ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानच्या विरोधात अद्याप सुरू असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळणे म्हणजे शहिदांच्या बलिदानाचा अपमान आहे, असा आरोप राऊत यांनी केला. पाकिस्तानबरोबर सर्व संबंध तोडण्याची भाषा करणाऱ्यांनी रक्त आणि क्रिकेट एकत्र कसे येऊ शकते? हे स्पष्ट करावे असे

सांगत राऊत यांनी भाजपवर टीका केली. आमच्या महिला-बहिणींचे उजाडलेले सिंदूर तुम्ही इतक्या लवकर विसरलात का? असा सवाल राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.

घराघरातून पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवणार

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याविषयी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन करताना शिवसेना (ठाकरे) पक्ष या स्पर्धेचा तीव्र शब्दांत निषेध करत असून येत्या १४ सप्टेंबरला शिवसेनेची (ठाकरे) महिला आघाडी ‘सिंदूर रक्षा’ आंदोलन करणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील प्रत्येक घरातून पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवले जाणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

Mumbai : उद्यापासून एलफिन्स्टन पूल बंद; दक्षिण मुंबईत होणार वाहतूककोंडी; अनेक मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल

लहान समाजात जन्मलो हे पाप आहे का?भुजबळांचा उद्विग्न सवाल; लातूरच्या कराड कुटुंबियांची सांत्वनपर भेट, मुंडेही उपस्थित

नेपाळ : आंदोलकांनी आग लावलेल्या हॉटेलमधून पळण्याच्या प्रयत्नात भारतीय महिलेचा मृत्यू

Ulhasnagar : सेंच्युरी कंपनीच्या कँटीनमध्ये बनावट कूपन घोटाळा उघडकीस; प्रिंटिंग प्रेसवर पोलिसांची कारवाई

धुळ्यात माजी स्थायी सभापतीच्या मुलाची आत्महत्या; वाढदिवसानंतर दोनच दिवसात उचललं टोकाचं पाऊल