महाराष्ट्र

साताऱ्यात ‘द बर्निंग बस’! शिवशाही बसला लागली आग; चालकाच्या प्रसंगावधानाने बचावले प्रवाशी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत दाखल असलेल्या सांगली आगाराच्या शिवशाही बसने मंगळवारी १० रोजी दुपारी २ वा.च्या सुमारास सातारा जिल्हा हद्दीतील वाढे फाटा रस्त्यावर अचानक पेट घेतला.

Swapnil S

कराड : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत दाखल असलेल्या सांगली आगाराच्या शिवशाही बसने मंगळवारी १० रोजी दुपारी २ वा.च्या सुमारास सातारा जिल्हा हद्दीतील वाढे फाटा रस्त्यावर अचानक पेट घेतला. त्यामुळे चालकाने प्रसंग ओळखून बस रस्त्याच्या कडेला उभी केली व प्रवाशांना जीव वाचवण्यासाठी तातडीने बसमधून खाली उतरण्यास सांगितल्याने प्रवाशांना बस सोडून रस्त्यावर उतरावे लागले. यामध्ये सुमारे ३५ प्रवाशांचा जीव वाचविल्याने बसचालक दादासाहेब कोळेकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे.

सकाळी साडेदहाच्या सुमारास पुणे-स्वारगेट येथून निघालेली शिवशाही बस सातारा जिल्ह्याच्या वाढे फाटा येथे आली असताना मागील चाकाचे टायर फुटून अचानक पेट घेतला. ही बाब चालक दादासाहेब कोळेकर यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ बस थांबवली व वाहक कबीर शेख यांना शिवशाही बसमधील ३५ प्रवाशांना तातडीने खाली उतरविण्याची सूचना दिली. सातारा न.पा. अग्निशामक दलाच्या बंबांनी व जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्याचे विशेष प्रयत्न केले. यावेळी महामार्गावर बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, मुंबई पोलीस ठाम ; भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश