महाराष्ट्र

महाबळेश्वर येथे देशातील पहिले ‘हनी पार्क’; एव्हरेस्ट मसालेमार्फत सहा लाखांचा सीएसआर निधी

मधाची निर्मिती, संशोधन व अभ्यास तसेच ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी देशातील पहिल्या ‘हनी पार्क’ ची निर्मिती महाबळेश्वरमध्ये करण्यात आली आहे तर दुसऱ्या ‘हनी पार्क’ची निर्मिती मुंबईत करण्यात आली आहे.

Swapnil S

कराड : मधाची निर्मिती, संशोधन व अभ्यास तसेच ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी देशातील पहिल्या ‘हनी पार्क’ ची निर्मिती महाबळेश्वरमध्ये करण्यात आली आहे तर दुसऱ्या ‘हनी पार्क’ची निर्मिती मुंबईत करण्यात आली आहे. यातील महाबळेश्र्वरमधील पहिल्या हनी पार्कचे मंगळवारी महाबळेश्वर येथील मध संचालनालयात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर, सह मुख्य कार्यकारी अधिकारी रेश्मा माळी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, संचालक रघुनाथ नारायणकार आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाने सीएसआर निधी उभारून मध उत्पादनाला चालना देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. एव्हरेस्ट मसाले यांनी दिलेल्या सहा लाखांच्या सीएसआर निधीमधून महाबळेश्वर येथील मध संचालनालयाच्या आवारातील तीन एकर जागेत ‘मधुबन’ हा हनी पार्क उभारला आहे. या पार्कमध्ये ३० मधपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. मधपेट्यांसह मध संकलन यंत्र, मध प्रक्रिया, स्वार्मनेट, राणी माशी पैदास उपकरण, पोलन ट्रॅप, ॲटी वेल ॲंड फिंडिंग, बी व्हेल आदी उपकरणे ठेवण्यात आली आहेत. मधमाशांचा अभ्यास करण्यासाठी येणारे शेतकरी, मधपाळ, शालेय सहलींमधून येणारे विद्यार्थी आणि पर्यटक आदींना एकाच ठिकाणी मध उत्पादनाची सर्व माहिती प्रात्यक्षिकांसह मिळणार आहे.

महाबळेश्वर येथील मध संचालनालय एक्सलन्स सेंटर व्हावे, असा प्रयत्न महामंडळाच्या माध्यमातून सुरू आहे. महाबळेश्वर येथे कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. उद्यानात कुशल मनुष्यबळ नसल्यामुळे रोजगाराची गरज असलेल्या आदिवासी महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांची नेमणूक केली जाणार आहे.

ग्रामोद्योगाला चालना देण्यावर भर : बिपीन जगताप

राज्यात मधाची निर्मिती, संशोधन व अभ्यास तसेच ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी देशातील पहिले हनी पार्क महाबळेश्वरला उभारण्यात आले आहे. या पार्कच्या माध्यमातून मध उत्पादन व मधमाशीबाबत सर्व माहिती मिळणार असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी 'नवशक्ति' शी बोलतांना दिली आहे.मांघर हे गाव देशात मधाचे गाव

मांघर हे गाव देशात मधाचे गाव

महाबळेश्वर परिसर हा स्ट्रॉबेरीसाठी देशभर ओळखला जातो आणि याच परिसरातील भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध झाले. आता याच महाबळेश्वर परिसरातील मांघर हे गाव देशात मधाचे गाव म्हणून ओळखले जात आहे. राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने मधाचे गाव हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला असून त्यासाठी महाबळेश्वरनजीक असलेल्या मांघर गावाची निवड करण्यात आले. मांघर हे महाबळेश्वरपासून ८ किलोमीटर अंतरावर डोंगरकड्याखाली वसलेले गाव आहे. गावाच्या भोवताली घनदाट जंगल असून या ठिकाणी वर्षभर फुलोरा असतो. गावात सामूहिक मधमाशांचे संगोपन केले जाते. मधमाशांच्या परपरागीकरणामुळे पिकांची उत्पादकता वाढते. गावातील ८० टक्के लोक मधमाशी पालनाचा व्यवसाय करतात.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत