आषाढी वारीसाठी लाखोच्या संख्येने वारकरी पंढरीच्या दिशेने रवाना झाले आहेत. संत ज्ञानेश्वर, आणि संत तुकाराम यांच्या देखील पालख्या इतर संतांच्या पालख्यांसह रवाना झाल्या आहेत. अशातच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनाला येणार आहेत. तसंच त्यांच्यासोबत त्यांच अख्ख मंत्रीमंडळ देखील घेऊन येणार आहेत. यावेळ हेलिकॉप्टरच्या माध्यमातून वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तब्बल ३०० गाड्यांच्या ताफ्यातून कर्नाटकचे मंत्रीमंडळ पंढरपुरात दाखल होणार आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा 'भारत राष्ट्र समिती' हा पक्ष महाराष्ट्रात आपला विस्तार करण्याच्या तयारीत आहे. त्यांनी त्या दिशेने पावले देखील उचलायला सुरुवात केली
आहे. यासाठी त्यांने थेट विठुरायाची पंढरी निवडली आहे. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री पंढरपुरात येणार आहे. त्यावेळी तेलंगणाचं अख्ख मंत्रीमंडळ पंढरपुरात असणार आहे. यावेळी परवानगी मिळाल्यास वारकऱ्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
चंद्रशेखर राव यांनी देशात शेतकऱ्यांचं राज्य आणण्याची घोषणा देत महाराष्ट्रातील अनेक नेते गळाला लावले आहेत. आता त्यांनी पक्षाची वाढ करण्यासाठी वारकरी सांप्रदायाच्या सर्वात मोठ्या सोहळ्याची निवड केली आहे. के चंद्रशेकर राव विठुरायाचं दर्शन घेऊन देशात शेतकऱ्यांचं राज्य येऊ दे असे साकडे पांडुरंगाला घालणार आहेत. ते २७ जून रोजी पंढरीत दाखल होणार असल्याने त्याच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे. यावेळी ते वारकऱ्यांशी देखील संवाद साधणार आहेत..