महाराष्ट्र

नूपुर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने संपुर्ण कुटुंबाने सोडले राज्य

वृत्तसंस्था

भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे उदयपूर येथे कन्हैयालाल आणि अमरावतीत उमेश कोल्हेंची हत्या झाल्याच्या घटना ताज्या असतानाच आता नागपुरातही असाच प्रकार समोर आला आहे. नूपुर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यामुळे नागपुरातील एका कुटुंबाला राज्य सोडून पळावे लागले. पोस्टनंतर सतत धमक्या येत असल्याची तक्रारही या कुटुंबाने नंदनवन पोलिसांत केली आहे. नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने १४ जून रोजी इन्स्टाग्रामवर नूपुर शर्माला पाठिंबा देणारी पोस्ट टाकली होती. त्यानंतर मध्यरात्री १ वाजल्यापासून त्याला सतत धमकीचे फोन आणि मेसेज येऊ लागले. त्यामुळे घाबरलेल्या तरुणाने पहाटे ४ वाजता नंदनवन पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर २ दिवसांनी सुमारे १०० जणांचा जमाव तरुणाच्या घरावर चाल करून आला होता. परंतु, तरुणाच्या कुटुंबीयांना या घटनेची पूर्वीच चाहूल लागल्यामुळे तरुण आणि त्याचे कुटुंब परिसरातील एका हॉटेलमध्ये जाऊन लपले होते. हॉटेलमध्ये दोन दिवस वास्तव्य केल्यानंतर त्यांनी नागपूर सोडले. त्यानंतर आपल्या एका नातेवाईकाकडे काही दिवस मुक्काम केला. परंतु, धमक्यांचा ससेमिरा न थांबल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र सोडून अज्ञात ठिकाणी वास्तव्य केले आहे. उदयपूर आणि अमरावतीच्या घटनांमुळे आमचे संपूर्ण कुटुंब घाबरलेले असून अज्ञात स्थळी लपून बसले आहे. तरीही पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप पीडित तरुणाच्या भावाने केला आहे.

माफी मागितल्या नंतरही धमक्या

नूपुर शर्माच्या समर्थनात पोस्ट करणाऱ्या तरुणाचा मोठा भाऊ व्यवसायाच्या संदर्भात नागपूरला आला. मात्र, त्याला लपतछपत वावरावे लागले. यासंदर्भात त्याने सांगितले, कुठल्याही धर्माचा अपमान करणे हा आमचा हेतू नव्हता. माझा लहान भाऊ तरुण असून त्याने चुकून पोस्ट फॉरवर्ड केली होती. आमच्या कुटुंबाने त्याला ती पोस्ट डिलीट करायला लावली. तसेच, दुसरी पोस्ट अपलोड करून माफी देखील मागायला लावली. परंतु, त्यानंतरही कुटुंबाला धमक्या दिल्या जात आहेत.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?