प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

पत्नीवर भररस्त्यात पतीचा चाकूहल्ला

प्रेमविवाह केलेल्या महाविद्यालयीन युवतीवर तिच्या प्रेमवीर पतीनेच भररस्त्यात चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Swapnil S

कराड : प्रेमविवाह केलेल्या महाविद्यालयीन युवतीवर तिच्या प्रेमवीर पतीनेच भररस्त्यात चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगलीतील गर्दीने गजबजलेल्या 'कॉलेज कॉर्नर' भागात बुधवारी हा प्रकार घडला. विशेष म्हणजे १९ वर्षीय विद्यार्थिनीने प्रेमविवाह केलेल्या पतीनेच चाकूहल्ला केल्याने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हल्ल्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सांगलीतील माधवनगर रोडवरील कॉलेज कॉर्नर भागात एका महाविद्यालयीन युवतीवर तिच्या पतीने चाकूहल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये युवतीने हाताने हल्ल्याला प्रतिकार केल्याने तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. कॉलेजला जात असताना युवतीच्या पतीने हल्ला केला.

दोघांचा नुकताच काही महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बुधवारी सकाळी सांगली कॉलेजकॉर्नर जवळील आपल्या महाविद्यालयात नेहमीप्रमाणे युवती आली होती. यावेळी तेथे तिचा पतीही आपल्या दुचाकीवरून आला होता. यावेळी त्या दोघात काही तरी वादावादी झाली अन् तरुणाने गाडीतून चाकू काढून तिच्यावर सापासपा वार करायला सुरुवात केली. याप्रकरणी जखमी युवतीला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली