महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला; आदोलकांनी केली बीड-कल्याण एसटी बसवर दगडफेक...

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पुन्हा एकदा हिंसक वळण लागल्यान प्रशासनाची चांगलीच धावपळ होताना पाहायला मिळत आहे.

नवशक्ती Web Desk

राज्यात परत एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अंदोलन, मोर्चे आणि उपोषन सुरु आहे. अशातचं बीडमध्ये परत एकदा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक असं वळण आलं आहे. काल रात्रीचं बीड कोल्हापूर ही बस पेटवून दिली असताना आज पुन्हा एकदा बीड कल्याण बसवर आदोलकांनी दगडफेक करत एसटी बस फोडली आहे. ही घटना बीडच्या सराटा गाव परिसरात घडली असून मराठा आंदोलक बस फोडून घटनास्थळावरून निघून गेले आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पुन्हा एकदा हिंसक वळण लागल्यान प्रशासनाची चांगलीच धावपळ होताना पाहायला मिळत आहे.

काल मध्यरात्री बीडमधील बायपास रोडला टायर जाळून निषेध करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर, बीडच्या धुळे सोलापूर रोडवर एक बस जाळण्यात आली आणि आज पहाटे पुन्हा एकदा बीड पासून काही अंतरावर असलेला चराटा फाटा या ठिकाणी कल्याण गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.

नांदेडहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात व्यक्तींनी बसला आग लावली होती. ही घटना शुक्रवारी रात्री ११.३० च्या सुमारास घडली. या भीषण आगीत बस जळून पूर्णपणे खाक झाली. या घटनेनंतर रात्री बस बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, पुन्हा एकदा सकाळी बस चालू झाल्या. आंदोलकांनी बीडच्या सराटा फाटा रोडला कल्याण गाडीवर दगडफेक करत या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video