महाराष्ट्र

पोलिसांच्या कुटुंबीयांचे प्रश्न सुटणार, देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

राज्य सरकारने समिती स्थापन केली हा स्वागतार्ह निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघटनेच्या अध्यक्षा यशश्री पाटील यांनी दै. ‘नवशक्ति’शी बोलताना व्यक्त केले.

गिरीश चित्रे

गिरीश चित्रे/मुंबई 

डोळ्यात तेल घालून राज्याची सुरक्षा करणाऱ्या पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या सोडवण्यासाठी अनेकदा आंदोलने केली.

मात्र आता राज्य सरकारने समिती स्थापन केली हा स्वागतार्ह निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघटनेच्या अध्यक्षा यशश्री पाटील यांनी दै. ‘नवशक्ति’शी बोलताना व्यक्त केले.  

सणासुदीचे दिवस असो आपत्कालीन स्थिती जनतेच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या ही अनेक समस्या आहेत.

घरांचा प्रश्न, सोयीसुविधा अशा विविध समस्या आहेत. पोलिसांच्या प्रश्नांसाठी झटणाऱ्या संघटनांनी वेळोवेळी आंदोलने झाली.

मात्र राज्य सरकारने आता पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांची समिती स्थापन केली आहे. 

राज्यातील पोलिसांच्या समस्यांसंदर्भात त्यांच्या कुटुंबीयांकडून वेळोवेळी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, अडचणींबाबत शासनाकडे निवेदने प्राप्त होत असतात.

पोलीसांच्या कुटुंबीयांना येणाऱ्या समस्या, अडचणींवर विचारविनिमय करून त्यावर तोडगा काढण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. कौशल्य कार्यक्रमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे, निवासस्थाने, आरोग्य इत्यादी समस्यांबाबत विचारविनिमय करुन त्याचे निराकरण करण्यासाठी ही समिती शासनास उपाययोजना सुचवणार आहे. 

राज्य सरकारने पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन केली, ही आनंदाची बाब आहे.

ही समिती पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या सोडवल्या जातील, असे मत यशश्री पाटील यांनी व्यक्त केले.

१२ सदस्यीय समिती अध्यक्ष : उपमुख्यमंत्री फडणवीस

सदस्य : दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा, कालिदास कोळंबकर, राम कदम, परिणय फुके, सिद्धार्थ शिरोळे, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण-कल्याण महामंडळाचे उपाध्यक्ष राहुल दुबाळे

मोठी बातमी! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; दुबार मतदान रोखण्यासाठीही आणलं खास 'टूल'

सातारा जिल्ह्यातील 'राधा' म्हशीचा जगात डंका; सर्वात बुटकी म्हैस म्हणून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद

ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला गती; देशातील सर्वात लांब शहरी बोगदा

कोइंबतूर विमानतळाजवळ गँगरेप प्रकरण; पोलिसांवर हल्ला करून पळण्याचा प्रयत्न करणारे तिघे अटकेत

डॉ. संपदा मुंडे मृत्यू प्रकरण : बेटी पढ़ी, पर बची नहीं... डॉक्टरांचे काम बंद आंदोलन; अधिकाऱ्यांचाही इशारा