महाराष्ट्र

आमदार प्रकाश सोळंकेंना फोन करणारा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात ; त्या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे आंदोलक आक्रमक

पोलिसांनी याप्रकरणी सुंदर भोसले या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

नवशक्ती Web Desk

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. तसंच सोळंके यांच्या बंगल्याच्या आरावात उभ्या असलेल्या गाड्याही मराठा आंदोलकांकडून जाळण्यात आल्या. हे सगळ प्रकरण आमदार प्रकाश सोळंके यांच्या एका व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे झालं. या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे मराठा आंदोलक आक्रमक झाले. सोळंकींच्या घरावरील दगडफेक प्रकरणी पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी सुंदर भोसले या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकेना एका मराठा आंदोलकानं फोन केला आणि मराठा आरक्षणाबाबत चर्चा सुरु केली. याच ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना प्रकाश सोळंकेनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल वक्तव्य केलं. त्याच वक्तव्यावरुन राढा झाला. प्रकाश सोळंके यांच्याशी झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर मोठा जमाव जमला आणि दगड फेकीसह जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी सुंदर भोसले या तरुणाला ताब्यात घेतलं असून हा तरुण धारुर तालुक्यातील धूनकवड येथील रहिवासी आहे. पोलिसांनी रात्री उशिरा त्याला ताब्यात घेतलं.

काय होती व्हायरल ऑडिओ क्लिप

सुंदर भोसले या मराठा आंदोलकाने आमदार प्रकाश सोळंके यांना फोन करुन मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा केली. मुदतीचे ४० दिवस संपल्याची आठवण या आंदोलकाने सोळंके यांना करुन दिली. त्यानंतर सोळंके म्हणाले की, "कोण म्हटलं सरकार आरक्षण देत नाही. ४० दिवस झाले म्हणून काय झालं? हे आरक्षण कोर्टात अडकवून ठेवायचं का परत? अशी आडमुठी भूमिका घेऊन चालत नाही. शासन देण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त दिलेलं आरक्षण कोर्टात टिकलं पाहिजे. एवढंच शासनाचं म्हणणं आहे. त्या दृष्टीने जे काही आवश्यक आहे. ते सर्व शासन करतंय. शासनाने समिती नेमली आहे. त्या समितीचा अहवाल घेऊन शासन आरक्षण देणार आहे."

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश