महाराष्ट्र

सूर्य पश्चिमेला उगवेल पण बारामतीमध्ये शरद पवारांचा पराभव अशक्य - जयंत पाटील

वृत्तसंस्था

आजवर अनेकांनी बारामतीला टार्गेट केले, येथे खोदून पाहिले; पण पाणी काही लागले नाही. एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल; पण बारामतीमध्ये शरद पवारांचा पराभव बारामतीकर होऊ देणार नाहीत,” असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून शरद पवार कुटुंबीयांचा पराभव करण्यासाठी भाजप खास व्यूव्हरचना आखत आहे, त्या अनुषंगाने पाटील बोलत होते.

भाजपचे यंदा ‘मिशन महाराष्ट्र’बरोबर ‘मिशन बारामती’ असल्याचे वक्तव्य करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार मुख्य लक्ष्य असल्याचे संकेत दिले होते. शिवाय केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन बारामतीचा दौरा करणार आहेत. त्यासाठी भाजपचे नेते बारामती मतदारसंघात ठाण मांडून बसले आहेत. अमेठीचा किल्ला जसा सर केला, तसा यंदा बारामतीचा किल्ला सर करणारच, असा इशारा भाजप आमदार राम शिंदे यांनी दिला होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला जोरदार टोला लगावला. “यापूर्वी अनेकांनी बारामती टार्गेट करून खोदून पाहिले; पण कोणाला पाणी लागले नाही. त्यामुळे हा प्रयत्न आजचा नाही. भाजपचे हे प्रचारतंत्र आहे; पण एखाद्या वेळी सूर्य पश्चिमेला उगवेल; मात्र शरद पवारांना बारामतीकर कधी सोडणार नाहीत,” असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना विरुद्ध शिंदे गटाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने २७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. याबद्दल जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. “वेळ लागू शकतो; पण एवढाही वेळ लागू नये की, विधानसभेची मुदत संपेल,” असे ते म्हणाले.

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

घसा बसलेला असतानाही शरद पवारांनी केलं भाषण, सुप्रिया सुळेंची सांगता सभा गाजवली

भारतीय महिला ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसह एकाच गटात; महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम