मुख्यमंत्री शिंदेंचा खळबळजनक आरोप 
महाराष्ट्र

मलाही गोवण्याचा डाव! मुख्यमंत्री शिंदेंचा खळबळजनक आरोप

परमबीर सिंग यांच्या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुजोरा देत त्यावेळी मलाही गोवण्याचा डाव होता, असा खळबळजनक आरोप केला आहे.

Swapnil S

मुंबई : मविआ सत्तेत असताना विरोधकांना अडकविण्यासाठी माझ्यावर दबाव आणला होता, असा गौप्यस्फोट काही दिवसांपूर्वी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. आता परमबीर सिंग यांच्या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुजोरा देत त्यावेळी मलाही गोवण्याचा डाव होता, असा खळबळजनक आरोप केला आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपानंतर या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे.

मविआचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख पदावर असताना वसुली करायचे आणि ही वसुली मविआतील नेत्यांच्या इशाऱ्यावर करायचे, असा आरोप बडतर्फ पोलीस सचिन वाझे याने केला होता. वाझे याच्या आरोपानंतर समित कदम याची एंट्री झाली. त्यामुळे अनिल देशमुख विरुद्ध सत्ताधारी पक्षाचे नेते यांच्यातील वाद चिघळला आहे.

या प्रकरणात सहकारी म्हणून मलाही अडकवण्याचे षडयंत्र रचले होते, असा गौप्यस्फोट आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांच्या आरोपांमुळे आता हे प्रकरण अधिकच पेटणार असून आगामी विधानसभा निवडणुकीत या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता आहे.

योग्य वेळ आल्यावर वाचा फोडणार!

त्यावेळी मलाही अडकविण्यासाठी प्रयत्न केले गेले. याविषयी मी योग्य वेळ आल्यावर सविस्तर वाचा फोडणार आहे, असा इशारा शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली