महाराष्ट्र

"त्यांना देशातील मोठ्या जाती संपवायच्या आहेत", जरांगे-पाटील यांचा अमित शहा यांच्यावर हल्लाबोल

Swapnil S

जालना/ छत्रपती संभाजीनगर

मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे, या आपल्या मागणीवर अजूनही मनोज जरांगे-पाटील ठाम आहेत. त्यांनी २० जुलैपासून उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचा रक्तदाब आणि शुगर कमी झाली आहे. शासकीय आरोग्य विभागाच्या पथकाने याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला. अमित शाह यांच्यासारख्या मोठ्या लोकांकडे आम्हाला देण्यासाठी वेळ नाही, हे फक्त मतदान घेतलं की, गरीबांना लाथा घालतात. त्यांना देशातील मोठ्या जाती संपवायच्या आहेत, पण यांना माहीत नाही मोठ्या जाती एकत्र आल्यावर काय होईल, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे जनआक्रोश यात्रेला सुरुवात करणार आहेत. लक्ष्मण हाके यांची ओबीसी यात्रा ही छगन भुजबळ यांनीच सांगितलेली आहे, भुजबळांशिवाय यांचे पानही हालत नाही. मी कधीही आंदोलन येवल्याला हलवू शकतो, असा इशारा जरांगे यांनी भुजबळांना दिला आहे.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था